पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवडीचे यंत्र

उसाची लागवड करताना होणार वेळ,श्रम व पैशाची बचत
pune
punesakal

वालचंदनगर : शेतकऱ्यांना ऊस लागवड करीत असताना कमी वेळेत व कमी कष्टामध्ये जास्त क्षेत्रामध्ये ऊस लागवड करण्यासाठी कळंब (ता.इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीतील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी‘ऊस लागवडीचे यंत्र’(शुगर केन प्लांटिंग मशीन) ची यशस्वी निमिर्ती केली असून यामुळे उस लागवड करताना वेळ,श्रम व पैशाची बचत होण्यास मोलाची मदत होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्र शेतकरी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. ऊस लागवड करीत असताना आजही पारंपारिक पद्धतीने उसाची लागवड केली जाते. सऱ्यामध्ये पाणी साेडून उसाचे कांडे दाबण्याची पद्धत प्रचलित आहे.यामुळे पाण्याचा जास्त अपव्य होतो. तसेच चरी खोदून उसाचे कांडे टाकून मातीने बुजविले त्यामध्ये पाणी सोडले जाते.

दिवसेंदिवस मजुरांच्या टंचाईमुळे उसाची लागवड करण्यास जास्त वेळ लागत असून लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात मजूरी शेतकऱ्यांना द्यावी लागते. कमी वेळेमध्ये व कमी कष्टामध्ये जास्त उस लागवड करण्यासाठी कळंब (ता.इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीमधील बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक काॅलेजमधील प्रसाद पाठक, काशिनाथ दुबळे, रोहन लांडगे व वैभव जगताप या चार विद्यार्थ्यांनी ‘उस लागवडीचे यंत्र’ची निर्मिती केली आहे. या यंत्रामुळे कमी वेळामध्ये उसाची लागवड करणे शक्य होणार आहे.

pune
'तुम्ही रडू नका' पराभवानंतर पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी संघाला फोन कॉल

विद्यार्थ्यांनी सायकल सारखे यंत्र तयार केले असून याच्या वरच्या भागामध्ये उसाचा कांड्या ठेवायच्या सोय केली आहे. लागवड करताना यंत्र आपोआप चरी खोदत असून उसाचे कांडी चरीमध्ये पडल्यानंतर आपोआप त्यांच्यावर माती ढकली जात आहे.यामध्ये अॅटोमिशनचा उपयोग करणे शक्य होणार आहे. यामुळे कमी मजूरामध्ये जास्त उसाची लागवड होणार असून वेळ ,श्रम व पैशाची बचत होण्यास मोलाची मदत होणार आहे. ऊस लागवडीचे यंत्र तयार करण्यासाठी पॉलिटेक्निकचे प्राचार्य नागेश ठोंबरे, विभाग प्रमुख उदय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे व दत्तात्रेय फडतरे यांनी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले असून त्यांचा सत्कार करण्यात आला.

तृतीय क्रमांकाचे बक्षीस

बारामतीमधील भारत फोर्ज कंपनीने स्किल इंडिया डे निमित्त गेल्या महिन्यामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये १०० प्रोजेक्टमधून उस लागवड यंत्राच्या प्रोजेक्टने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com