आॅस्ट्रेलियन चाखणार महाराष्ट्राच्या डाळिंबांची गोडी

प्रवीण डोके
Monday, 7 September 2020

राज्यातून पुढील काही दिवसांत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया येथे डाळिंब निर्यात होणार आहे. ऑस्ट्रेलिया येथे आयातीकरिता कोणत्याही देशाचा कृषीमाल खुला करावयाचा असल्यास त्याचा आठ स्तरावर विस्तृत अभ्यास केला जातो. डाळींब निर्यातीबाबतीत सध्या महाराष्ट्र शेवटच्या टप्प्यात आहे.

मार्केट यार्ड (पुणे) : राज्यातून पुढील काही दिवसांत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया येथे डाळिंब निर्यात होणार आहे. ऑस्ट्रेलिया येथे आयातीकरिता कोणत्याही देशाचा कृषीमाल खुला करावयाचा असल्यास त्याचा आठ स्तरावर विस्तृत अभ्यास केला जातो. डाळींब निर्यातीबाबतीत सध्या महाराष्ट्र शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच ऑस्ट्रेलियन बाजारपेठत भारतीय डाळिंब जाणार आहेत.

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन बाजारपेठ चांगला दर देणारी आणि शाश्वत बाजारपेठ आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या डाळिंबाला चांगला भाव मिळणार आहे. सध्या ताज्या कृषिमालामध्ये भारतातून ऑस्ट्रेलिया येथे फक्त आंबाच निर्यात होतो. परंतु महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या पाठपुराव्यामुळे राज्यातून डाळिंब हे देखील ऑस्ट्रेलियात निर्यात होणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी सांगितले.

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

जगभरातील विविध देशातून ऑस्ट्रेलियामध्ये वर्षाकाठी सुमारे ४००० मे. टन एवढ्या डाळींबाची आयात केली जाते. डाळिंबाच्या वैद्यकिय गुणधर्मामुळे ऑस्ट्रेलियामध्ये त्याची आयात दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पणन मंडळाने पावले उचलली आहेत. ऑस्ट्रेलियाचा भारताशी आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध दृढ होण्याच्या अनुषंगाने ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयाचे कृषी कौन्सिलर जॉन साऊथवेल यांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे येथे मागील वर्षी भेट दिली होती. यावेळी सुनील पवार, पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी डाळिंब निर्यातीवर चर्चा झाली होती.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डाळिंब निर्यात करण्यासाठी राज्य कृषि पणन मंडळाच्या वाशी येथिल विकिरण सुविधा केंद्रावर चाचण्या घेतल्या
त्याबाबतचा अहवाल व प्रस्तावित प्रोटोकॉल ऑस्ट्रेलियाच्या कृषी विभागास सादर
 विकीरण सुविधेवर ऑस्ट्रेलियन तज्ञांची दोन वेळा तपासणी भेट

डाळिंब निर्यातीच्या प्रोटोकॉल आस्ट्रेलियन शासनाच्या संकेतस्थळावर

डाळिंब निर्यातीच्या प्रोटोकॉलचा मसुदा आस्ट्रेलियन शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देऊन डाळिंब निर्यातीमध्ये काम करणारे विविध उत्पादक संघ, निर्यातदार, शास्त्रज्ञ यांनी त्यांचे अभिप्राय संबंधीत संस्थेस देण्याबाबत कृषि पणन मंडळामार्फत आवाहन करण्यात आले.
 

 

राज्यातील प्रमुख पिकांपैकी डाळिंब हे एक पीक आहे.  ऑस्ट्रेलियन बाजारपेठ चांगला दर देणारी आणि शाश्वत बाजारपेठ आहे. त्यामुळे बाजारपेठ जलदगतीने खुली होण्याच्या दृष्टीने जॉन साऊथवेल यांच्या स्तरावर प्रयत्न करण्याची त्यांना विनंती केली होती. आपण सध्या शेवटच्या टप्प्यात आहोत.
 - सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate exports from the state to Australia soon