शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना डाळिंबाची विक्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

निरगुडसर - डाळिंबाचे भाव कोसळल्याने वाहतुकीचा खर्चही वसूल होणे अवघड झाले आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पुणे, मुंबईच्या बाजारपेठेकडे पाठ फिरवली असून थेट ग्राहकांना डाळिंब विकण्यावर भर दिला आहे. काही जण आठवडे बाजारात तर काहीजण थेट घरोघरी जाऊन विक्री करीत आहेत. काहींनी नाशिक महामार्गावर स्टॉल लावले आहेत. स्वस्त डाळिंबामुळे ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी होत आहे.

डाळिंब सध्या तीस रुपयांवर उतरले आहेत. १०० रुपयांत तीन किलो डाळिंब विकली जात आहेत. मुंबई, पुणे बाजारपेठेत माल पाठवण्याचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकऱ्याने माल पाठवणी बंद केली आहे. 

डाळिंबासाठी औषधांची फवारणी, खते, औषधे, मजुरी यासाठी एकरी साधारण एक ते सव्वा लाख रुपये खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सध्या मिळणारा दर शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे नफा तर सोडाच शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्चच वसूल होणे अवघड झाले आहे. लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील डाळिंब उत्पादक शेतकरी शांताराम चवरे यांनी डाळिंबाचे दर उतरल्याने नाशिक महामार्गावर एकलहरे (कळंब) येथे स्टॉल लावला आहे. दररोज २०० किलोहून अधिक डाळिंब विकले जात आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत दीड टनांहून अधिक मालाची विक्री झाली आहे, असे चवरे यांनी सांगितले.

Web Title: Pomegranate farmers sell directly to customers