पूजा चव्हाणच्या मोबाईलमध्ये दडलयं काय? 'ती' व्यक्ती कोण?

pooja chavan suicide important evidence mobile phone
pooja chavan suicide important evidence mobile phone

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर महाआघाडी सरकारमधील एक राज्यमंत्राचे नाव या प्रकरणामध्ये पुढे येत आहे, पूजाने आत्महत्या केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत तिचा मोबाईल मिळवा, इतर कोणाच्या हातात मोबाईल पडु देऊ नका, असे एका व्यक्तिने फोनद्वारे पूजाचा चुलतभाऊ व त्याच्या मित्राला वारंवार बजावले होते, अखेर फोनवरील "ती" व्यक्ती कोण आहे आणि तिच्या मोबाईलमध्ये नेमके दडलेय काय ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती कोण?
पूजा स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी पुण्यात आली होती. त्यानंतर ती वानवडी येथील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये तिचा चुलत भाऊ व त्याच्या मित्रासमवेत राहात होती. पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस आगोदर पूजाचा भाऊ, त्याच्या मित्राच्या एक व्यक्ती सातत्याने मोबाईलद्वारे संपर्कात होती. ती व्यक्ती पूजाच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवुन होती, असे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपद्वारे स्पष्ट होत आहे. ऑडिओ क्लिपमधील संभाषणामध्ये पूजावर उपचार सुरू होते, तसेच ती सातत्याने रडत असल्याचे, तिच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याची चर्चा सुरु होती. तसेच फोनवरील व्यक्तीने पूजाला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करावे, असेही तिच्या भावाच्या मित्राकडून संबंधित व्यक्तीला सांगण्यात येत होते.

'पहिला मोबाईल ताब्यात घ्या!'
दरम्यान, रविवारी रात्री पूजाने तिच्या खोलीचा दरवाजा आतून लावून घेतल्याचे तसेच तिने सदनिकेच्या गैलरीतून उडी मारल्याची माहिती फोनवरील व्यक्तीला देण्यात आली. त्यानंतर फोनवरील व्यक्तीने पूजाचा मोबाईल त्वरीत ताब्यात घ्या, असे तिच्या भावाच्या मित्राला सांगितले. मात्र पूजाचा दरवाजा बंद असल्याने आतमध्ये पोचता येत नसल्याचे त्याला सांगण्यात आले.दरम्यान, पुजाला दवाखान्यात नेण्यात आल्यापासून, डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यापासून ते तिचे शवविच्छेदन करण्यापर्यंतच्या वेळेपर्यंत फोनवरील 'ती' व्यक्ती पूजाचा मोबाईल ताब्यात घेण्यास बजावत होती. पूजाच्या खोलीचा दरवाजा तोडा, ते शक्य नसल्यास दोरीने गॅलरीत जाऊन मोबाईल ताब्यात घ्या, असाही मार्ग सुचविल्याचे त्यांच्या संभाषणातून पुढे आले आहे. त्यामुळे पूजाच्या मोबाईलमध्ये "त्या" व्यक्तीचे नेमके काय दडले आहे, ज्यामुळे तिचा मोबाईल मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात होता, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिला आहे.

आणखी वाचा  - पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला!

मोबाईल कुटुंबीयांच्या ताब्यात
पूजाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मोबाईल तिच्या कुटुंबाने त्यांच्या ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये मोबाईलची गरज वाटल्यास पोलिसांकडून तो मोबाईल ताब्यात घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महिला आयोगाचेही पत्र
या प्रकरणाशी महाआघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचा संबंध असल्याची जोरदार चर्चा आहे. विरोधी पक्षानी त्यावरून मोठ्या प्रमाणात रान उठविले आहे, असे असताना आता या प्रकरणात महिला आयोगनेही उडी घेतली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी आयोगाने आपल्या पत्राद्वारे पुणे पोलिसांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com