अश्‍लील चित्रीकरण करून धमकी देणाऱ्या तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

लोणी काळभोर - व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रेयसीबरोबर बोलताना न कळत झालेले अश्‍लील चित्रीकरण वेबसाइटवर टाकण्याची धमकी देत, तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या बेगडी प्रियकराच्या नाड्या लोणी काळभोर पोलिसांनी आवळल्या आहेत. प्रतीक राजेंद्र जाजू (वय २०, रा. लासूर, जि. लातूर) असे प्रियकराचे नाव आहे. प्रतीक यास औरंगाबादहून बुधवारी (ता. ८) अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिली.

संबंधित एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिची व आरोपी प्रतीक याची शाळेपासून मैत्री होती. प्रतीक हा सध्या औरंगाबाद येथे राहत आहे. प्रतीक व संबधित मुलीच्या मैत्रीचे रूपांतर मागील वर्षभरापूर्वी प्रेमामध्ये झाले. त्यानंतर संबंधित तरुणी प्रतीकला भेटण्यासाठी दोन-तीन वेळा औरंगाबादलाही गेली होती. प्रतीक औरंगाबादला, तर संबंधित तरुणी लोणी काळभोर परिसरात राहत असल्याने, दोघांमध्ये मोबाईलवरून व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे होत होते. प्रतीक हा मोबाईलवरून व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे चालू असताना, संबंधित तरुणीला अश्‍लील हावभाव करण्यास सांगत असे.

प्रतीकने १७ जुलैला व्हॉट्‌सॲपवरून संबंधित तरुणीची एक व्हिडिओ क्‍लिप तिच्या मोबाईलवर पाठवली आणि पाच लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा, ही क्‍लिप सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. यावर मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने ही बाब भावाला सांगितली.

Web Title: Pornography crime