पुणे : पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्यास 'या' दाट वस्त्यांना धोका...

parvati water tank.jpg
parvati water tank.jpg
Updated on

सहकारनगर (पुणे): पर्वती येथील पाण्याच्या टाकीचा तडा जाऊन टॉपचा स्लॅब कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याच्या टाकी खाली दाट लोकसंख्या असणाऱ्या जनता वसाहत, लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, महात्मा फुले वसाहत असा झोपडपट्टीचा भाग असून कोणत्याही परस्थितीत भविष्यात धोका निर्माण होऊन जीवितहानी होऊ शकते. म्हणून पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती करून सीसीटीव्ही बसवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

यावेळी कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पर्वती विधानसभा मतदारसंघाचे दिलीप अरुंदेकर म्हणाले, लक्ष्मीनगर पर्वती जलशुद्धीकरण केंद्र येथील तीन टाक्या आहेत. येथून दक्षिण पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र येथील दोन्ही टाक्यांचा टॉपचा स्लॅब धोकादायक असून स्लॅबला तडा गेला आहे. कोणत्याही परिस्थितीत भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो म्हणून गेले पाच वर्षे या गोष्टीचा पाठपुरावा करून वारंवार स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागकडे निवेदन पत्रव्यवहार करून सुद्धा याकडे अद्याप लक्ष दिले गेले नाही. यापुढे येथील वेळीच काम पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक नंदकिशोर जगताप म्हणाले, पर्वती येथील गोल एचएलआर टाकी मधील टॉपच्या स्लॅबची दुरवस्था झाली असून 24/7 योजना अंतर्गत एलएमटी कडून पाण्याच्या टाक्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच येथील पाण्याच्या चौकोनी टाकीची दुरुस्त करण्यात आलेली आहे.

नागरिकांच्या मागण्या:
१)पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती करण्यात यावी.

२) सेन्सर्स नादुरुस्त असल्याने वारंवार पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होईन पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे येथे सेन्सार बसवण्यात यावे.

३) मद्यपी याठिकाणी मद्यपान करत असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.

४) सुरक्षा रक्षक नसल्याने सुरक्षितेचा अभाव आहे. यामुळे येथे सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com