कोकण, गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता

कोकण, गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता

पुणे -  कोकण आणि गोव्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाने उघडीप दिली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. मराठवाड्यातील तुरळक भागात पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण कमी झाले. त्याचा थेट परिणाम राज्यातील पावसाचा जोर कमी होण्यावर झाला आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली. राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याचा अंदाज आहे. 

पुण्यात हलक्‍या सरी
शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात गुरुवारी दुपारी पावसाच्या एक-दोन सरी पडल्या. त्यानंतर मात्र फक्त ढगाळ वातावरण होते. पुण्यात एक जून ते चार जुलैदरम्यान सरासरी १६२.४ मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत २२९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा ६७.२ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

मॉन्सूनची प्रगती सुरू
नैॡत्य मोसमी वाऱ्याची (मॉन्सून) उत्तर भारतातील प्रगती मजल-दरमजल करत सुरू आहे. संपूर्ण गुजरात, मध्य प्रदेश व्यापून राजस्थानच्या काही भागात मॉन्सूनने गुरुवारी प्रगती केली. शुक्रवारपर्यंत (ता. ५) देशातील आणखी भागात मॉन्सून पोचेल, अशी अनुकूल स्थिती आहे, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे पुढील काही दिवसांत मॉन्सून देश व्यापेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com