पुणे जिल्ह्यात चार ग्रामीण रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटर 

Rajesh-Deshmukh
Rajesh-Deshmukh

पुणे - कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना उपचार आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्ह्यातील चार ग्रामीण रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. औंध, भोर, मंचर आणि दौंड येथील रुग्णालयांमध्ये हे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील दोन लाख 96 हजार 990 कोरोना बाधित रुग्णांपैकी दोन लाख 56 हजार 485 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 33 हजार 691 इतकी आहे. कोरोनाबाधित सहा हजार 814 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

ग्रामीण भागात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खडकवासला, नऱ्हे, मंचर, कदमवाकवस्ती, वाघोली, मरकळ, चऱ्होली, म्हाळुंगे, मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी भागात बाधित रुग्णसंख्येत घट झाली आहे. खडकवासला, नऱ्हे, कदमवाकवस्ती, चऱ्होली येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. या बरे झालेल्या रुग्णांच्या समुपदेशनासाठी पोस्ट कोविड केअर सेंटर करण्यात येणार आहेत. 

'सिमरन' वेधतंय ग्राहकांचं लक्ष; मागणीमुळे दरामध्ये वाढ

जिल्ह्यातील स्थिती -
कोरोना बाधित रुग्ण मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के 
बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.36 टक्के 

सध्या कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी योगा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच, पोस्ट कोविड केअर सेंटरमुळे बरे झालेल्या रुग्णांना उपचारासोबत त्यांचे समुपदेशन करणे शक्‍य होईल. 
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com