esakal | सामाजिक जाणिवेतून केले मरणोत्तर अवयवदान I Organ Donate
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Misal

सामाजिक जाणिवेतून केले मरणोत्तर अवयवदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज - गोकुळनगर येथील रहिवासी असलेले महेश प्रल्हादराव मिसाळ यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ५१व्या वर्षी हृदयविकाराचा धक्का व ब्रेन डेड झाल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन सामाजिक जाणिवेतून महेश यांचे मरणोत्तर अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. डोळे, लिव्हर आणि त्वचा या अवयवाचे दान करण्यात आले आहे. यामधून दृष्टिहीन रुग्णास दृष्टी मिळाली असून मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णाला लिव्हर आणि त्वचा मिळाल्याने जीवदान मिळाले आहे.

महेश मिसाळ हे अभियंता होते. त्यांना गिर्यारोहणाची विशेष आवड होती. महेश यांचे सामाजिक कार्य व समाजासाठी सतत काहीतरी करण्याची धडपड या जाणिवेतून मिसाळ कुटुंबियांनी एकत्र येऊन महेश यांचे मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतला. ज्या गरजू रुग्णांना महेश यांचे अवयव दिले आहेत त्या अवयवाच्या माध्यमातून महेश यापुढेही आमच्यात राहणार आहे अशी भावना मिसाळ कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: बारामतीत सहायक पोलिस उपनिरिक्षकास लाच घेताना अटक

मिसाळ कुटुंबचा हा निर्णय सर्वांसाठीच प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. रुबी हॉल रुग्णालयामध्ये अवयवदान करण्यात आले. महेश दक्षिण पुणे वकील संघटनेचे पदाधिकारी अॅड. उमेश मिसाळ यांचे बंधू होते. महेश यांच्यामागे आई-वडील व पत्नी आणि मुलगी व मुलगा, एक भाऊ व ३ बहिणी असा परिवार आहे.

loading image
go to top