टपाल कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

माले - कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी संघटनेने सुचविलेल्या बदलासह तातडीने मंजूर कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक युनियनच्या वतीने मंगळवारपासून (ता. २२) बेमुदत संपाचे आवाहन करण्यात आले आहे. या संपात पुणे जिल्ह्यातील सर्व पोस्टमन, डाक कर्मचारी सहभागी होणार आहेत.  

याबाबत युनियनच्या पुणे ग्रामीण विभागाचे खजिनदार अविनाश ढमाले व मुळशी तालुका प्रतिनिधी जयवंत शेंडे यांनी माहिती दिली की, विभागीय कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मंजूर होऊन सुमारे २८ महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र तरीही सरकारचे लक्ष नाही. या संपात संघटनेचे अध्यक्ष महेंद्र राऊत व सचिव एकनाथ मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोस्टमन, डाक कर्मचारी सहभागी होणार आहेत.

Web Title: post office employee strike