कात्रजमधील पोस्ट कार्यालयाचे होणार स्थलांतर

राजस सोसायटीजवळील महापालिकेची इमारत सज्ज; आयुक्तांची मंजुरी
post office in Katraj will be relocated
post office in Katraj will be relocatedsakal

कात्रज : कात्रज परिसरातील दत्तनगर चौक रस्त्यांवर असणाऱ्या पोस्टाच्या कार्यालयाचे (Post office)लवकरच स्थलांतर होणार आहे. राजस सोसायटी जवळील महापालिकेच्या जागेत उभारण्यात आलेल्या 'सरदार नरवीर नावजी बलकवडे बहुउद्देशीय इमारत'(Sardar Narveer Navji Balkwade Multipurpose Building)या दुमजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर पोस्ट हे स्थलांतर होणार आहे. ही इमारत नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांच्या प्रभागस्तरीय निधीतून उभारण्यात आली आहे. हे पोस्ट कार्यालय नवीन आणि महापालिकेच्या सुसज्ज जागेत सुरू होत असल्याने नागरिकांना याचा फायदा होणार असून कात्रज-कोंढवा रस्ता, सुखसागर नगर, खंडोबामंदिर परिसर, कात्रजगाव, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, संतोषनगर आदी भागात राहणाऱ्या नागरिकांना आपले पोस्टाचे व्यवहार करणे भौगोलिकदृष्ट्या सहज शक्य होणार आहे.

महापालिकेची ही वास्तू पोस्टाला भाडेतत्वार देण्यात येणार असून वास्तूचे काही दिवसातच पोस्टाकडे हस्तांतरण होणार आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे असून या प्रक्रियेसाठी महापालिका आयुक्तांनीही मंजुरी दिली आहे. दुमजली इमारतीपैकी तळमजल्याची पार्किंग(parking) व्यवस्था आणि १६२.७४ चौ.मी पहिला मजला असे क्षेत्र पोस्ट खात्याला वापरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी सोयीचे ठरणार आहे.

post office in Katraj will be relocated
गांधी म्हणतात, 'भाजपने माझा आणि आईचा सन्मान केला'

आम्हाला ही जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून महापालिकेने तशी तयारी दर्शविली आहे. उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली की पोस्टाचे लवकरच स्थलांतर होईल. ही इमारत सुसज्ज आणि महापालिकेची असल्याने नागरिकांसाठी सोयीचे ठरणार आहे. तसेच, पोस्ट खात्यालाही नागरिकांना सुविधा पुरविणे सोपे जाणार आहे.

- मुकुंद बडवे, प्रवर अधीक्षक, डाकघर पुणे शहर पश्चिम विभाग, पुणे

कात्रज परिसरातील कात्रजचौक ते खडीमशीन चौक आणि बिबवेवाडी परिसरातील लोकसंख्या ही लाखोंच्या घरात आहे. या परिसरातील जेष्ठ नगरिक, निवृत्तीवेतन धारक व सर्वसामान्य लोकांना जीव धोक्यात घालून कात्रजचा रहदारीचा मुख्य चौक ओलांडून दत्तनगर येथील पोस्ट कार्यालयात जावे लागत होते. परंतु, राजस सोसायटी परिसरात पोस्ट कार्यालय होत असल्याने मोठी गैरसोय टळणार असल्याचा आनंद आहे.

- ऍड. अभिजित विश्वनाथ साकुरकर, स्थानिक नागरिक, महावीरनगर

post office in Katraj will be relocated
दिल्ली, महाराष्ट्राने वाढवली देशाची चिंता; ब्रिटेनमध्ये १४ मृत्यू

महापालिका बांधकाम विभाग आणि पुणे विभागीय टपाल खाते यांच्या समन्वयातून कात्रजमध्ये पोस्ट कार्यालयासाठी सर्व सुविधायुक्त नवीन इमारत राजस सोसायटीजवळ उभी राहिली आहे. लवकरच पोस्टाकडे इमारत सुपूर्त होणार असून नागरिकांचा त्रास वाचणार आहे.

- मनीषा कदम, नगरसेविका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com