उल्हासनगरात जनसंपर्क अधिकाऱ्याच्या विरोधात साखळी आंदोलनकर्त्यांची पोस्टरबाजी

दिनेश गोगी
बुधवार, 13 जून 2018

उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये तब्बल 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरी देखील पालिका बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी साखळी आंदोलनाद्वारे भदाणेच्या विरोधात पोस्टरबाजी बाजी केली आहे.या आंदोलनकर्त्यांनी भदाणेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पालिकेने कॅबिनमध्ये मिळालेल्या घबाडांचा जबाबासाठी सात दिवसांचा अल्टीमेट भदाणे यांना नोटीसीद्वारे दिला आहे. अन्यथा पुढील कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील दिला आहे.

तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी हे विशेष पद बहाल करताना या पदाअंतर्गत पाणी पुरवठा,शिक्षण आणि संपूर्ण शहराचा अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचा अतिरिक्त पदभार सोपवला होता.मात्र हे असंवेधानिक पद असल्याच्या तक्रारी शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी,रिपाइंचे नगरसेवक भगवान भालेराव तर वणवा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष निलेश पवार यांनी भदाणे यांच्या असंवेधानिक नियुक्तीची तक्रार थेट राज्यपाल व मुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री यांच्याकडे केली होती. निंबाळकर यांची बदली झाल्यावर आणि त्यांच्या जागी गणेश पाटील आयुक्तपदी आल्यावर त्यांनी भदाणे यांना सर्व अतिरिक्त पदांपासून मुक्त केले. विशेष म्हणजे भदाणे हे पूर्वनियोजित रजेवर जाण्याच्या आदल्या सायंकाळीच भदाणे यांच्याकडील अतिरिक्त चार्ज काढून घेण्यात आला.

मात्र भदाणे हे रजेवर जाताना त्यांनी त्यांच्या कॅबिनची चावी मुख्यालयात जमा करण्याऐवजी घरी ठेवली. या कॅबिनमध्ये अनेक फाईली असण्याची आणि त्या गायब होण्याची शक्यता असल्याची तक्रार नगरसेवक राजेंद्र चौधरी, भगवान भालेराव , मनोज लासी यांनी केल्यावर मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे यांनी ही कॅबिन सील केली. दोन तीन दिवसानंतर ही सील केलेली कॅबिन आयुक्त गणेश पाटील, महापौर मिना आयलानी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. माजी नगरसेवक दिलीप मालवणकर, आरटीआय कार्यकर्ते प्रकाश तलरेजा या पंचांसमक्ष संपूर्ण कॅबिनमध्ये 387 दस्तावेजांचे घबाड मिळून आले. त्यात अनेक विभागाच्या विविध फाईली, कोरे धनादेश व महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्त दर्जाचे बोगस ओळखपत्र अशा दस्तावेजांचा समावेश आहे.

दरम्यान 6 जून रोजी या घबाडांची मोजणी करण्यात आली. त्याला सात दिवसांचा कालावधी झाल्यावरही पालिकेच्यावतीने भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ काल पालिकेसमोरच्या चौकात कारी माखिजा, जगदिश तेजवाणी, परमानंद गेरेजा, दिलीप मालवणकर, कुलदीपसिंह मथारू, सावी मथारू आदींनी साखळी आंदोलनाद्वारे भदाणेच्या विरोधात पोस्टरबाजी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

भदाणे यांच्या कॅबिनमध्ये जे 387 दस्तावेज मिळाले आहे. त्याचा जवाब सात दिवसात देण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जवाब दिला नाही तर पुढील कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील नोटीसीत देण्यात आला आहे.मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी ही माहिती दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In posters of chain protesters used against the public relations officer in Ulhasnagar