गुलटेकडी परिसरात धोकादायक खड्डे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पुणे :  शहरात सातत्याने सुरू असणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर माेठे खड्डे पडले अाहेत. महापालिकेच्या गैरकारभारामुळे महर्षिनगर आणि गुलटेकडी भागातील धोकादायक खड्डे आणि चेंबरची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. 

पुणे :  शहरात सातत्याने सुरू असणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर माेठे खड्डे पडले अाहेत. महापालिकेच्या गैरकारभारामुळे महर्षिनगर आणि गुलटेकडी भागातील धोकादायक खड्डे आणि चेंबरची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. 
या भागात असंख्य धोकादायक खड्डे आणि तुटलेले चेंबर असल्याचे  'सकाळ'च्या पाहणीत निदर्शनास आले आहे. सर्व चेंबर खचलेले आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे. तुटलेल्या चेंबर्समुळे गेल्या 4 दिवसांत 12 जणांचा अपघात झाला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही, परंतु गंभीर इजा आणि मणक्‍याच्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका नागरीप्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
''दररोज या रस्त्याचा वापर मी करताे.  सततची असणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे यामुळे कोणाचाही जीव जाऊ शकतो. लवकर हे काम करून घेणे गरजेचे आहे,'' असे वाहनचालक सचिन कडलाजी यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pothole at gultekadi