मुंबई
Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..
Mumbai Children hostage accused Rohit Arya died in police encounter: मुलांना ऑडिशनला बोलावून बरंवाईट करण्याची धमकी देणारा रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्याच्यावर गोळी झाडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं.
मुंबईः पवईमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणातील आरोपी रोहित आर्य याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी रोहित आर्यच्या छातीवर गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

