esakal | वीज कंत्राटी कामगारांचा एल्गार; दिला बेमुदत आंदोलनाचा इशारा!
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitaran-Workers

कंत्राटी कामगारांच्या प्रश्‍नात तातडीने लक्ष घालून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी १५ जून पासून टप्प्याने संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

वीज कंत्राटी कामगारांचा एल्गार; दिला बेमुदत आंदोलनाचा इशारा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा येत्या सात जुलैपासून बेमुदत संप करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने दिला आहे. 

शिवराज्याभिषेक दिन ऑनलाइन; ३२ देशांतील मराठी बांधव सहभागी

संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात आणि कोशाध्यक्ष सागर पवार यांनी शुक्रवारी (ता.१२) पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. ते म्हणाले, "या तिन्ही कंपन्यांत मिळून सुमारे २२ हजार कंत्राटी कामगार काम करीत आहे. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला.

या काळातही कंत्राटी कामगारांनी काम केले. तीन महिन्यात राज्यात विविध ठिकाणी झालेल्या वीज अपघातामध्ये ९ कर्मचारी दगावले. तर सात कर्मचाऱ्यांना अपंगत्व आले. त्यांना आजपर्यंत कोणतीही मदत या कंपन्यांकडून मिळालेली नाही.

पन्नास जणांच्या उपस्थितीत आषाढी पालखी प्रस्थान सोहळा

एवढेच नव्हे, तर कंत्राटदार कंपनीने देखील कामगारांच्या पगारात कपात केली आहे. त्यामुळे अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या प्रश्‍नात तातडीने लक्ष घालून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी १५ जून पासून टप्प्याने संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही दखल घेतली नाही, तर ७ जुलैपासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे, असे संघटनेचे पवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

loading image
go to top