esakal | मोठ्या गावांच्या विकासाला पंचतत्त्वांचे बळ
sakal

बोलून बातमी शोधा

Panchtatv

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पर्यावरण संतुलनासाठी पंचतत्त्वांचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे खास अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २४ गावांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व गावांमध्ये चालू आर्थिक वर्षात (२०२०-२१) पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांनुसार विकासकामे केली जाणार आहेत.

मोठ्या गावांच्या विकासाला पंचतत्त्वांचे बळ

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पर्यावरण संतुलनासाठी पंचतत्त्वांचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे खास अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २४ गावांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व गावांमध्ये चालू आर्थिक वर्षात (२०२०-२१) पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांनुसार विकासकामे केली जाणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील ३४ गावे यासाठी निवडण्यात आली; परंतु यापैकी सात गावे ही पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत, तर एक गाव बारामती नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे ही आठ गावे वगळून उर्वरित २६ गावांमध्ये हे अभियान सुरू करण्यात आले आहे. 

पुणे - रिंगरोडसाठी भूसंपादन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय; अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे व पिंपरी अमृत शहरे
माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि मोठ्या गावांची निवड करण्यात आलेली आहे. यात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेसह पुणे जिल्ह्यातील १३ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचा समावेश आहे. यासाठी निवडलेल्या शहरांना अमृत शहरे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड ही दोन्ही अमृत शहरे असणार आहेत. या पंचतत्त्वांनुसार सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे. 

भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी गाडीच्या टायरला अचानक आग; गाडी जळून खाक

जिल्ह्यातील निवडलेली गावे 
राहू, इंदुरी, बावडा, आंबेगाव खुर्द, कडुस, निमगाव केतकी, वारुळवाडी, वरवंड, आळे, बोरीपार्धी, रांजणगाव गणपती, यवत, तळेगाव ढमढेरे, कळंब, पाटस, माळेगाव बुद्रुक, कदमवाकवस्ती, शिक्रापूर, बारामती ग्रामीण, ओतूर, नारायणगाव, लोणी काळभोर, उरुळी कांचन. 

Corona Update - पश्चिम महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यातील आकडेवारी दिलासादायक

पंचतत्त्वांची वर्गवारी 
पृथ्वी - या पहिल्याच पंचतत्त्वानुसार गावांमध्ये वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि जमिनीची धूप याबाबत कामे केली जाणार आहेत. 

वायू - हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणारी कामे करण्यात येणार आहेत. यात वायुप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा केली जाणार आहे. 

जल - नदी संवर्धन, जैवविविधता जतन करणे, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन करणे आणि नदी किनाऱ्यांची स्वच्छता केली जाईल.

अग्नी - या चौथ्या तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जेचा अपव्यय टाळणे, त्यात बचत करणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी रिकाम्या असलेल्या जागा, पडीक जमिनी आणि शेतीचे बांध यासारख्या जागांवर पारंपरिक उर्जेबाबतचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. 

आकाश - या तत्त्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरूपात मानवी स्वभावातील बदलांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाईल.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top