व्हॉट्‌सॲपवर करता येणार आता वीज समस्यांची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

वीज तारा तुटणे, पोल पडणे, जमिनीवर तारा लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फीडर पिलरचे दरवाजे तुटणे आदींसह वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या समस्यांची माहिती आता व्हॉट्‌सॲपद्वारे महावितरणला देता येणार आहे. ही सुविधा महावितरणने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

पुणे - वीज तारा तुटणे, पोल पडणे, जमिनीवर तारा लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फीडर पिलरचे दरवाजे तुटणे आदींसह वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या समस्यांची माहिती आता व्हॉट्‌सॲपद्वारे महावितरणला देता येणार आहे. ही सुविधा महावितरणने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत या माध्यमातून महावितरणकडे २९३ तक्रारी आल्या असून, त्यापैकी २२० तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले आहे. 

Bird flu outbreak : पुणे जिल्ह्यात 13 कोंबड्या, दोन कावळ्यांचा मृत्यू

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यांसाठी ७८७५७६७१२३, तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्‍यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉट्‌सॲप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती अथवा तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्‌सॲपद्वारे माहिती द्यावी. ज्या नागरिकांकडे व्हॉट्‌सॲप नाहीत, त्यांना ‘एसएमएस’द्वारे माहिती देता येणार आहे. या उपक्रमाला सार्वजनिक वीज सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तक्रारकर्त्यांना मिळणार अपडेट 
व्हॉट्‌सॲपद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांना व्हॉट्‌सॲपद्वारे दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे.

...आता मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांचा मार्ग झाला मोकळा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power issues can now be reported on WhatsApp