Bird flu outbreak : पुणे जिल्ह्यात 13 कोंबड्या, दोन कावळ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ व मध्य प्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रातही काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत.

पुणे : जिल्ह्यात 13 कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन कावळे मृत झाल्याचे आढळून आले आहे. बर्ड फ्लू रोगामुळेच हे पक्षी मृत झाले की नाही, याबाबत पशुसंवर्धन आयुक्‍तालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. राज्यात आजअखेर तीन हजार 338 विविध पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ व मध्य प्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रातही काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत.

यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!​

अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​

राज्यात लातूर 47, गोंदिया 25, चंद्रपूर 86, नागपूर 110, यवतमाळ 10, सातारा 50 आणि रायगड जिल्ह्यात 3 अशा एकूण 331 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 34, अमरावती आणि सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी 1 बगळा, पोपट, चिमण्या आणि वर्धा येथे 8 मोर अशा एकूण 44 पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

नाशिक, यवतमाळ, नंदुरबार जिल्ह्यांत प्रत्येकी एक, पुणे आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी दोन असे राज्यात एकूण सात कावळे मृत झाले आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास 48 तास लागू शकतात, असे पशुसंवर्धन आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.

पुण्याच्या दक्षिण भागाला आता दररोज पाणीपुरवठा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 hens, two crows die in Pune district after Bird flu outbreak in Maharashtra