पुण्यात ८ दिवसांपासून विजेचा लपंडाव; विद्यार्थी, शिक्षक, आयटी कर्माचऱ्यांना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लघु उद्योगांना आर्थिक फटका बसत आहे. बहुतांश विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा सुरू असून परीक्षेच्या काळात महावितरण सेवा विस्कळीत होत असल्यामुळे  विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. सध्या सगळी कामे विजेवर अवलंबून आहे. मात्र खंडित सेवांमुळे सगळीकडेच अंधार झाला आहे.  
 

धनकवडी(पुणे) : पुणे शहरासह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. परिणामी ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षकांची अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तारांबळ उडत आहे. तसेच  आयटी आणि सेवा क्षेत्रातील वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागत आहे.

सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लघु उद्योगांना आर्थिक फटका बसत आहे. बहुतांश विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा सुरू असून परीक्षेच्या काळात महावितरण सेवा विस्कळीत होत असल्यामुळे  विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. सध्या सगळी कामे विजेवर अवलंबून आहे. मात्र खंडित सेवांमुळे सगळीकडेच अंधार झाला आहे.  

पुण्यात IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन​

धनकवडीतील बहुतांश भागात गुरुवारी सकाळी पाच तास वीज गायब झाली होती. शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढू लागल्याने पंखे, कूलर व एसी यांचा वापर वाढला आहे. अशा स्थितीत शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभर वीजपुरवठा अगदी दहा-दहा मिनिटांनी बंद पडण्याचे प्रकार झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त झाला.

धनकवडीतील  कलानगर, गुलाबनगर, चैत्यन्यनगर, अशा अनेक भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू होता.  महावितरणकडून दुरुस्ती कामासाठी वीजपुरवठा बंद राहणार असेल तर तसे ग्राहकांना आधी एक-दोन दिवस मोबाइलवर 'एसएमएस'द्वारे कळवले जाते. परंतु, वीजपुरवठा बंद राहणार असल्याबाबतचा कोणताही संदेश नसताना अचानक वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिक वैतागले होते.  

पुणे- मुंबई 'एक्सप्रेस वे'वर दोन अपघात; दोघांचा मृत्यू

महापारेषण' कंपनीच्या वीज उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडाने महावितरण च्या धनकवडी भागाचे अभियंता संजय घोडके म्हणाले, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ते जेजुरी या 400 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड झाला व वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे जेजुरी ते कोयना टप्पा क्र. 4 या 220 केव्ही अतिउच्चदाब वाहिनीचा व त्यावरील नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा देखील वीजदाब कमी झाला. या उपकेंद्रातील कमी वीजदाबामुळे महावितरणचे पर्वती व पद्मावती विभागातील सुमारे 15 उपकेंद्र आणि 82 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काही ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, सर्वच ठिकाणी भारव्यवस्थापन शक्य नसल्याने नाईलाजास्तव  धनकवडी, शांतीनगर, कात्रज, आंबेगाव, बालाजीनगर आदी परिसरात सध्या दोन ते अडीच तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करण्यात येत आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power outage in Pune for 8 days