पुणे जिल्ह्यातील कोलमडलेली वीजयंत्रणा केव्हा होणार सुरू?; वाचा सविस्तर  

M,AHA.jpgM,AHA.jpg
M,AHA.jpgM,AHA.jpg
Updated on

पुणे : पावसाचा महावितरणच्या यंत्रणेला फटका बसल्यानंतर तिसऱ्या दिवशीही जिल्हयातील काही भागात वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. दरम्यान, मावळ, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्‍यात जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा पुन्हा उभारण्याचे महावितरणकडून सुरु आहे.

दरम्यान, पावसामुळे निसरडा झालेला डोंगराळ भाग, चिखल, पडलेली झाडे, फांद्या अशा प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे 200 अभियंता व 1 हजार 250 कर्मचारी वीजयंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामात गुंतले आहे. 

चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर मावळ, जुन्नर, खेड व आंबेगाव तालुक्‍यातील बंद पडलेले 33/11 केव्ही क्षमतेचे सर्वच 47 उपकेंद्र सुरु करण्यात महावितरणाला यश आले आहे. या उपकेंद्रांमधून निघणाऱ्या 309 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जुन्नर व मावळ भागातील अतिदुर्गम व मोठ्या प्रमाणावर हानी झालेल्या 78 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याने तसेच दुर्गम भाग असल्याने दुरुस्ती कामांना वेळ लागत आहे. 

पुणे ग्रामीण मंडलमधील मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव या चार तालुक्‍यांमध्ये वीजयंत्रणेच्या उभारणीसाठी महावितरणचे 200 अभियंते व 800 जनमित्र तसेच कंत्राटदारांचे 450 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन वीजयंत्रणेच्या दुरुस्तीची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्यासह महावितरणचे अभियंते व कर्मचारी मावळ, जुन्नर तालुक्‍यांमध्ये बंद असलेली वीजयंत्रणा पुन्हा उभारणीसाठी युद्धपातळीवर काम करीत आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

येत्या 24 तासांमध्ये दुर्गम व अतिदुर्गम भागातील बंद असलेली उर्वरित वीजयंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com