Power Supply : मंचरला गुरुवार शुक्रवार व शनिवारीही सहा तास वीजपुरवठा बंद

लहान मोठ्या व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. महावितरण कंपनी बद्दल नाराजी.
Power supply cut off Manchar for six hours Thursday Friday and Saturday pune
Power supply cut off Manchar for six hours Thursday Friday and Saturday punesakal

मंचर : मंचर शहरातील वीज पुरवठा शुक्रवारी( ता. ९) पाच तास व शनिवारी (ता. १०)सहा तास बंद होता. शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाल्याने शेतकऱ्यांची समजूत काढल्यामुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शनिवारी संध्याकाळी सहा वाजता वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यश आले. पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग लगत मंचर जवळ असलेल्या शेवाळवाडी मणिपूर(ता. आंबेगाव) येथे शॉर्टसर्किट झाल्यामुळे शुक्रवारी शेतकरी दीपक थोरात व सदानंद भोर यांच्या ऊस पिकाला आग लागली होती त्यामध्ये तोडणी योग्य असलेला सहा एकर क्षेत्रातील ऊस जळून गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तुटलेल्या वीजवाहिन्या जोडण्यास विरोध केला होता. त्यामुळे मंचर फिडर सुरू होऊ शकला नाही.

महावितरण कंपनीने मंचर शहरासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तपनेश्वर व मोरडेवाडी या दोन फिडर वरून पर्यायी व्यवस्था करून वीज पुरवठा सुरू केला होता. शनिवारी संबंधित शेतकऱ्यांची समजूत काढण्याचे काम महावितरण कंपनीचे मंचर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता जयवंत गेटमे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केले. आज दुपारी बारा वाजता नवीन वीज वाहिन्या जोडण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम पूर्ण होईपर्यंत तपनेश्वर व मोरडेवाडी हे दोन्ही फिड र बंद ठेवावे लागले. वीज वाहिन्या जोडून आवश्यक त्या दुरुस्त्या केल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मंचर शहरातील वीजपुरवठा पूर्व सुरू झाला.

शेवाळवाडी मणिपूर विज उपकेंद्रात आवश्यक त्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी काम सुरू होते. त्यामुळे बराच वेळ मंचर शहरातील वीज पुरवठा बंद होता. शॉर्टसर्किट झाल्याने शुक्रवारी ऊसाला आग लागल्यामुळे वीज वाहिन्या वितळून गेल्या. दुरुस्तीच्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे पाच तास वीज बंद होती. शनिवारी वीज वाहिन्या जोडणे व दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी बारा ते संध्याकाळी सहा पर्यंत वीजपुरवठा बंद होता. सलग तीन दिवस वीजपुरवठा बंदचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.त्याचा मोठा परिणाम पिठाच्या गिरण्या, लहान मोठे वर्कशॉप, टेलर, ब्युटी पार्लर,संगणक प्रशिक्षण वर्ग, व अन्य२०० व्यावसायिकांवर झाला. त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे व्यवसायिकांनी महावितरण च्या कामाविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मंचर शहराला अखंड वीजपुरवठा मिळावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com