‘विकासकामांनी वानवडीचा चेहरामोहरा बदलला’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

हडपसर - महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ (वानवडी) मधून राष्ट्रवादीचे चारही उमेदवार एकत्रितपणे पदयात्रा, वैयक्तिक गाठीभेटी, प्रचार पत्रकांचे वाटप या माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचत आहेत. महिला मंडळ, तरुण मंडळ, गणेश मंडळ, बचतगट, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत. केलेल्या विकास कामांचा अजेंडा व वानवडी भागाचा चेहरामोहरा बदलल्याने मतदारांचा पाठिंबा असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. 

वानवडी (प्रभाग क्र. २५) प्रभागातून महापौर प्रशांत जगताप, त्यांच्या मातु:श्री माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, दिलीप जांभूळकर आणि कांचन जाधव हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जांभूळकर व कांचन जाधव यांचे सामाजिक कार्य आणि माजी नगरसेविका रत्नप्रभा जगाताप यांनी या भागात केलेल्या विकास कामांमुळे राष्ट्रवादी पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.  

सोमवारी शांतिनगर, शिंदे छत्री, जगतापनगर या भागांतून काढलेल्या पदयात्रेत राष्ट्रवादीचे चारही उमेदवार सहभागी झाले होते. 

वानवडीतील रहिवाशी संतोष जाधव म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीचे उमेदवार केवळ मतदान करण्याचे आवाहन करत नसून, सोसायट्यांच्या सभागृहात, पार्किंगमध्ये नागरिकांशी सवांद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. महापौर जगताप यांच्यामुळे वानवडी भागातील पायाभूत प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यांना कोणत्याही नागरिकांनी फोन केला तर, तातडीने सांगितलेली समस्या सुटते.’’

प्रचारफेरीत आर. डी. जाधव, जर्नाधन शेलार, सत्तार भाई, रावसाहेब पाटील मनियारभाई, विठ्ठल शेलार, रामदास जगताप, बापू सोनावणे, जगन्नाथ पाटील, अनिल पंडित, जयवंत शिंदे, सुमन सुत्रावे, अंजू मोहिते, धनंजय कुलकर्णी, वैशाली जाधव, शिंदे, अनिल धुमाळ अल्का शितोळे, ज्योत्स्ना रोकडे, विकी कड, निरू द्दत्ता, शशिकला शिंता, पिंकी लाड, बबन निर्मळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Web Title: prabhag 25 wanwadi