रिक्त पदे व औषधासाठी पाठपुरावा करणार : प्रदीप माने

दत्ता म्हसकर
बुधवार, 23 मे 2018

जुन्नर - माने यांनी जिल्ह्यात तालुकास्तरीय आढावा सभांमधून कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  यावेळी तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रदीप माने यांनी दिले.

जुन्नर - माने यांनी जिल्ह्यात तालुकास्तरीय आढावा सभांमधून कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  यावेळी तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रदीप माने यांनी दिले.

जून अखेर सर्व तालुक्यात आढावा सभांचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी ता.22 रोजी जुन्नर तालुका पंचायत समितीच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पांडुरंग पवार, देवराम लांडे, आशा बुचके, गुलाब पारखे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, शाम माळी, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, कार्यकारी अभियंता लांजुरणे, उपअभियंता आर.एस.इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने,शाखा अभियंता, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

माने म्हणाले प्रधानमंत्री मातृवंदन, कुंटूब कल्याण कार्यक्रम, आयुष्मान भारत आदी योजनांसाठी लाभार्थीस अनुदान देताना आघारकार्ड व बँक खात्यांची अडचण येते. त्यासाठी रुग्ण कल्याण समिती मार्फत पाठपुरावा करण्यात यावा. नविन आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे बांधकाम मंजूरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. 

ते पुढे म्हणाले, कॅन्सरमुक्त महाराष्ट्र कार्यक्रम आशांमार्फत सुरु झाला आहे. औषधे व साहीत्य पुरवठा बाबत प्रत्येक आरोग्य केंद्राचा वैयक्तिक आढावा घेतला असून, मधुमेह व रक्तदाबच्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात येईल. तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचलन व आभार रामभाऊ तळपे यांनी मानले.

या सभेत सभापतींनी जुन्नरला अधिकारी व कर्मचारी मिळून काम करत असल्याचा लौकिक जिल्ह्यात असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे सूत्रसंचालकांसह तालुका आरोग्य अधिकारी, वैदयकीय अधिकारी यांना काही जुन्नरच्या सदस्यांकडून अवमानकारक वागणूक दिल्याने कर्मचाऱ्यांमधे नाराजीचे वातावरण होते. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माजी अध्यक्षांनी माझ्याशी गाठ आहे. फोनवर बोलू नका आमच्याकडे लक्ष द्या असा दम भरला. तर तुम्हाला काही कळत नाही बसा खाली, माझे नाव वर का घेतले नाही प्रोटोकॉल कळतो का ? अशी भाषा महिला सदस्या कडून वापरली गेली असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Pradeep Mane will follow up for vacant positions and medicines