

Prakash Ambedkar
esakal
पुणे : दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सरकारने केलेली कारवाई "खूप उशिरा आणि अत्यंत अपुरी" असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे एक वर्ष आणि त्यांची मेहनत वाया गेल्याची भावना असल्याने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, हीच आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.