सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी प्रकाश जगताप

संतोष शेंडकर
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुरूम (ता. बारामती) - येथील प्रकाश किसनराव जगताप यांची सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या शासन नियुक्त संचालक पदी नुकतीच निवड झाली. यामुळे जगताप यांना दुसऱ्यांदा सोमेश्वरचे संचालक बनण्याची संधी मिळाली आहे.

मुरूम (ता. बारामती) - येथील प्रकाश किसनराव जगताप यांची सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या शासन नियुक्त संचालक पदी नुकतीच निवड झाली. यामुळे जगताप यांना दुसऱ्यांदा सोमेश्वरचे संचालक बनण्याची संधी मिळाली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यावर सहकार कायदा अधिनियम 1960च्या कलम 73अ नुसार शासन नियुक्त संचालक साखर आयुक्तालयाकडुन पाठविण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर कारखान्यावर राज्य सरकारकडून कोणाला पाठविले जाते याबाबत गेले सहा महिने उस्तुकता ताणली गेली होती. योग्य नावाच्या शोधात भाजपा श्रेष्ठीकडून ही निवड प्रलंबित राहीली होती. अखेर या पदासाठी पालकमंत्र्यांकडून जगताप यांच्या नावाबाबतच अनुकूलता आल्यावर सहकार मंत्र्यांनी, सहकार सचिवांनी साखर आयुक्तांना सदर नावाचे निर्देश दिले. त्यानुसार साखर आयुक्त कार्यालयाने जगताप यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र सोमेश्वर कारखान्यास दिले. 

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत या निवडीस मंजुरी देण्यात आली. जगताप यांना नुकतेच निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. जगताप हे 2002 ते 2007 या कालावधीत राष्ट्रवादीविरोधी गटातून संचालक झाले होते. त्यावेळी त्यांनी सक्रीय विरोधकाची भूमिका बजावली होती. यावेळीही ते आपला मागचा अनुभव वापरून भाजपाचा आवाज उमटवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यानिमित्ताने भाजपाने कारखान्याच्या इतिहासात प्रथमच चंचुप्रवेश केला आहे. पावणेदोन वर्षांनी होणाऱ्या कारखान्याच्या निवडणूकीची तयारी भाजपा प्रथमच करत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Prakash Jagtap as the Director of Someshwar Co-operative Sugar Factory