हसत्या खेळत्या संसाराला हातभार लावणारी समर्थ पत्नी, दोन चिमुरड्या मुलांची देखभाल करणारे वयोवृध्द आईवडील असा सुतारदरा येथे राहणाऱ्या प्रकाश शेलार संसार चांगला चालला होता. हातात थोडे पैसे आले म्हणून त्याने भुकूम येथे छोटी जागा विकत घेवून घर बांधायला घेतले. या घराचे काम करत असताना तो अचानक तोल जावून वीजेच्या तारांवर पडला. या अपघातात त्याचा जीव वाचला परंतु हातपाय मोठ्या प्रमाणात भाजल्याने शस्त्रक्रिया करुन ते काढावे लागले.
कोथरुड : हसत्या- खेळत्या कुटुंबावर प्रकाशच्या अपघातामुळे आभाळच कोसळले. विजेच्यां तारांवर पडल्याने प्रकाशचे हात-पाय निकामी झाले. कुटंबावर संकट ओढावले. अखेर स्वयंसेवी संस्थाच्या मदतीसाठी पुढे सरसरावल्या आणि प्रकाश त्याच्या कृत्रिम पायांवर उभा राहिला. आता तो वाट पाहतोय केव्हा त्याला कृत्रिम हात मिळतील आणि पुन्हा कुटुंबासाठी सर्व काही करु शकेल. पण आर्थिक मदतीअभावी त्याला आणखी वाट पाहावी लागत आहे. प्रकाशच्या कुटुंबाला गरज आहे ती मदतीची.
हसत्या खेळत्या संसाराला हातभार लावणारी समर्थ पत्नी, दोन चिमुरड्या मुलांची देखभाल करणारे वयोवृध्द आईवडील असा सुतारदरा येथे राहणाऱ्या प्रकाश शेलार संसार चांगला चालला होता. हातात थोडे पैसे आले म्हणून त्याने भुकूम येथे छोटी जागा विकत घेवून घर बांधायला घेतले. या घराचे काम करत असताना तो अचानक तोल जावून वीजेच्या तारांवर पडला. या अपघातात त्याचा जीव वाचला परंतु हातपाय मोठ्या प्रमाणात भाजल्याने शस्त्रक्रिया करुन ते काढावे लागले.
राज्याच्या वेगवेगळ्या भागात लशीसाठी शीतगृहे सज्ज
धक्कादायक दुर्घटनेमुळे प्रकाशच्या जीवनात निराशेचा अंधार पसरला. अशावेळी माणुसकी मदतीला आली. रुग्णालयातील उपचार व उपजिविकेचा खर्च मित्र परिवार, मालक, वीमा कंपनी व सहृद नागरिकांनी दिलेल्या मदतीमुळे भागवता आला. आता सुध्दा या सर्वांच्या मदतीमुळे त्याच्या कुटूंबाची गुजरान होत आहे. मुलांच्या देखभाली बरोबर पतीचीही देखभाल करण्याची जबाबदारी आल्यामुळे पत्नीला काम सोडण्याची वेळ आली. आता घर कसे चालवायचे व निराशेच्या गर्तेत गेलेल्या पतीला पुन्हा पुर्वस्थितीत कसे आणायचे हे मोठे आव्हान प्रकाशच्या पत्नीसमोर उभे आहे.
स्वयंसेवी संस्थाच्या मदतीतून बसवलेल्या कृत्रिम पायामुळे प्रकाश आता स्वतःच्या पायावर उभा राहू लागलाय. एवढेच नव्हे तर तो रोज चालण्याचा सरावसुध्दा करतोय. आता त्याला कृत्रिम हात बसवून पुर्ववत करणे बाकी आहे. त्यासाठी पस्तीस लाख रुपयाचा निधी लागेल असे केरळच्या रुग्णालयाने सांगितले आहे. ही मदत मिळाल्यास पत्नी, दोन लहान मुले व वृध्द आई वडील यांची जबाबदारी पुन्हा पुर्वीच्याच जोमाने अंगाखांद्यावर घेवू शकतो असा विश्वास प्रकाशला आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त महिलांची आठवडी बाजारात खरेदीसाठी गर्दी
''हात, पाय गमावले असले तरी समाजातील माणुसकीमुळे प्रकाशमध्ये पुन्हा पायावर उभे रहायची उमेद निर्माण झाली आहे. कृत्रिम हात लावून कुटूंबाची जबाबदारी घेण्यासाठी तो उत्सुक आहे. ''
- प्रकाश शेलार
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रकाशला मदत करु इच्छिणारांनी 9822757430, 8129050806 या क्रमांकावर संपर्क साधावा.