आयुर्वेदिक पद्धतीबरोबरच प्राणायाम आवश्यक - डॉ. नागेंद्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उत्तम रोगप्रतिकारशक्ती राखण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या उपचार पद्धतीबरोबरच प्राणायाम करणे गरजेचे आहे, असे मत स्वामी योग अनुसंधान संस्थेचे कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी व्यक्त केले.

पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उत्तम रोगप्रतिकारशक्ती राखण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या उपचार पद्धतीबरोबरच प्राणायाम करणे गरजेचे आहे, असे मत स्वामी योग अनुसंधान संस्थेचे कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 'युवकांसाठी योग' या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात पतंजली योग अध्यासन, आरोग्यशास्त्र विभाग आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ यांचा सहभाग होता.

पुणेकरांनो, ही लेणी आहे तुमच्या हाकेच्या अंतरावर...तिच्यात असणारी वैशिष्ठ्ये जगात कोठेही नाहीत... 

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, रामकुमार राठी, योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, योग अभ्यासक डॉ. मन्मथ घरोटे, समन्वयक डॉ. सुनंदा राठी, केंद्र शासनाच्या योग व निसर्गोपचार संस्थेचे संचालक डॉ. राघवेंद्र राव सहभागी झाले. 

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व समाज मानसिक तणावाखाली आहे. विद्यार्थीही त्याला अपवाद नाहीत. परीक्षा आणि अभ्यासक्रम यांच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांनी मनोबल वाढविण्यासाठी योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन डॉ. करमळकर यांनी केले. 

निवृत्तीनाथांच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

आरोग्यशास्त्र विभागाच्या संचालिका डॉ. आरती नगरकर यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक माने, आरोग्यशास्त्र विभागातील सहाय्यक वैद्य गिरीश टिल्लू आदी मान्यवर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranayama is necessary along with Ayurvedic method dr HR Nagendra