प्रशांत देशमुख यांना आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार 

दत्ता म्हसकर
गुरुवार, 19 जुलै 2018

जुन्नर - राष्ट्रीय व राज्य पातळीवरील साखर उद्योगाशी निगडीत काम करणाऱ्या राष्ट्रीय शुगर संस्थेने येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे हिवरे बुद्रुक ता.जुन्नर येथील ऊस उत्पादक सभासद व प्रगतशिल शेतकरी प्रशांत विश्वासराव देशमुख यांना 'भारतीय शुगर, आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार २०१८' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. देशमुख यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी त्यांचा  सत्कार केला.

कार्यक्रमाला श्री शेरकर, उपसभापती उदय भोपे, समर्थ पॉलिटेक्निकचे वल्लभ शेळके, सरपंच लहुशेठ गुंजाळ, ज्ञानेश्वर भोर, सचिन भोर, मुख्य शेतकी अधिकारी गोरखनाथ उकिर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष शेरकर म्हणाले, विघ्नहर कारखान्याच्या दृष्टीकोनातून ही अतिशय भूषणावह अशी बाब आहे.प्रशांत देशमुख यांनी विघ्नहरच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकां समोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे अनुकरण करून ऊस उत्पादक शेतकरी बांधवानी ऊस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला सत्यशिल शेरकर यांनी शेतकऱ्यांना दिला. 

Web Title: Prashant Deshmukh received best sugarcane producer award