मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत प्रशांत गावडे राज्यात दुसरा 

संतोष आटोळे 
सोमवार, 2 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत भटक्या जाती -जमाती प्रवर्गातून (एन.टी.) पारवडी (ता.बारामती) येथील प्रशांत सखाराम गावडे या विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्याने मिळविलेल्या या यशाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) विभागा अंतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या 833 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पारवडी येथील कै.जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सखाराम गावडे  यांचे सुपुत्र प्रशांत गावडे यांनी  पहिल्याच प्रयत्नात सदर परिक्षेत यश मिळवित एन.टी.प्रवर्गात राज्यात दुसरा तर सर्वसाधारण मध्ये 51 वा क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

दरम्यान प्रशांतच्या या यशाबद्दल भैरवनाथ शिक्षण संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, सचिव संगीता गावडे, गावचे सरपंच जिजाबा गावडे, माजी पंचायत समिती सदस्य तानाजी गावडे, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी त्याचे व त्यांच्या कुटुंबियाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

मुलांच्या  यशाने खुप आनंदी -प्राचार्य सखाराम गावडे
या यशाबाबत  बोलताना प्रशांतचे वडील प्राचार्य सखाराम गावडे म्हणाले, प्रशांतने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविल्याने आम्हा सर्व कुटुंबीयांसह, नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांना खुप आनंद झाला आहे. त्याला लहानपणा पासुन स्पर्धा परिक्षेबाबत आकर्षण होते.त्यादृष्टीने त्याने तयारी केली हे त्याचे फलित आहे.माझा दुसरा मुलगा अमोल गावडे हा एमबीबीएस  मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. एकंदरीत प्रामाणिक पणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते.

Web Title: Prashant Gawde in the state of Motor Vehicle Observer