

Parth Pawar statement prashant kishor
esakal
Prashant Kishor meeting news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काम करणार असल्याच्या चर्चांना आता पार्थ पवार (Parth Pawar) यांनी स्वतः स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला आहे. प्रशांत किशोर आणि पवार कुटुंबीयांमध्ये झालेल्या भेटीनंतर विविध माध्यमांतून सुरू झालेल्या तर्कवितर्कांवर प्रतिक्रिया देताना पार्थ पवार यांनी ही केवळ स्नेहभेट असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार क्षेत्रातून काही वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली असून ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी रणनिती आखणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.