बारामतीतील प्रतिभा स्पर्धेत प्रतिक ठाकरे व श्रुती बोरस्ते विजेते

बारामतीतील प्रतिभा स्पर्धेत प्रतिक ठाकरे व श्रुती बोरस्ते विजेते
Updated on

बारामती : येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ऑनलाईन प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रतीक ठाकरे व श्रुती बोरस्ते यांनी विजेतेपद पटकाविले. 

या स्पर्धेत महाराष्ट्रातील महाविद्यालयातील 170 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील वरिष्ठ गटातील विजेते - प्रतीक ठाकरे (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे),  अश्विनी ठावरे (आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे), वृषभ चौधरी (एच. पी. टी. कॉलेज, नाशिक), अमृता जगदाळे (कर्वे इन्स्टिट्यूट सोशल सर्व्हिस, पुणे) सांघिक विजेतेपद पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अश्विनी ठावरे व पंकज माने यांच्या संघाने पटकाविले.
 
कनिष्ठ गटातील विजेते- श्रुती बोरस्ते (एचपीटी कॉलेज, नाशिक), अनिश काळभोर (जयहिंद जुनियर कॉलेज, पुणे), रेणुका धुमाळ (सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद), प्रांजल कुलकर्णी (एन. एस. गुळवे कॉलेज, श्रीगोंदा) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर झाली. सांघिक विजेतेपद पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाच्या चैतन्य बनकर व जान्हवी शेलार यांच्या संघाला मिळाले. 

डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. स्पर्धेचे यंदाचे 19 वे वर्ष होते. यंदा प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्य डॉ. भरत शिंदे, कार्याध्यक्ष श्रीराम गडकर यांनी दिली. 

यंदा वरिष्ठ विभागासाठी अभिजात मराठी भाषा: स्वप्न की सत्य, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे योगदान, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, कोरोना काळात काय कमावले काय गमावले, गुगल: एक वैश्विक महागुरू हे तर कनिष्ठ विभागासाठी शरदचंद्रजी पवार: एक राष्ट्रीय नेतृत्व, ऑनलाइन शिक्षणाचे फायदे तोटे,  स्वगत: एका कोरोना योध्याचे, आसमानी संकटात सापडलेला बळीराजा, ग्रंथ आमचे गुरु असे विषय देण्यात आले होते.  

राजेंद्र आगवणे, ज्योती जोशी,  डॉ. विजय केसकर, डॉ. संजय मोरे  डॉ. प्रकाश पांढरमिसे, संतोष पानसरे, डॉ. मनीषा काकडे, प्रा. संभाजी कांगुणे, सलिम बागवान यांनी परिक्षण केले.

उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ शामराव घाडगे, अंकुश खोत, डॉ. उत्कर्षा ठाकरे, कार्याध्यक्ष डॉ. श्रीराम गडकर, डॉ. आनंदा गांगुर्डे, नंदकुमार खळदकर यांनी विशेष परिश्रम घेतले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com