esakal | सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट, चॅटिंग सुरू, व्हिडिओ कॉल आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसतो
sakal

बोलून बातमी शोधा

Social-Media

फेसबुकवर सुंदर प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आकर्षणापोटी तरुणांकडून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्‍सेप्ट केली जाते. ऑनलाइन चॅटिंग सुरू होते. बोलणे वाढल्यानंतर व्हिडिओ कॉल होतो आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसला जातो. अशाप्रकारे व्हिडिओ कॉलवर झालेले अश्‍लील संभाषण नातेवाइकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत किरकटवाडी व खडकवासला परिसरातील अनेक तरुणांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट, चॅटिंग सुरू, व्हिडिओ कॉल आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसतो

sakal_logo
By
नीलेश बोरुडे

किरकटवाडी - फेसबुकवर सुंदर प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आकर्षणापोटी तरुणांकडून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्‍सेप्ट केली जाते. ऑनलाइन चॅटिंग सुरू होते. बोलणे वाढल्यानंतर व्हिडिओ कॉल होतो आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसला जातो. अशाप्रकारे व्हिडिओ कॉलवर झालेले अश्‍लील संभाषण नातेवाइकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत किरकटवाडी व खडकवासला परिसरातील अनेक तरुणांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत काही तरुणांनी सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार केली आहे, तर बदनामीच्या भीतीने काही तक्रार देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

अश्‍लील संभाषण फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून फ्रेंड लिस्टमधील नातेवाइकांना पाठवून बदनामी करण्याची भीती दाखवत दहा हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत पैशांची मागणी, अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या तरुणींकडून केली जात आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ कॉलवर अश्‍लील संभाषण जरी झालेले नसले तरी एडिट करून सदर संभाषणाला अश्‍लील भाग जोडला जात आहे. शारीरिक आकर्षणातून किंवा सौंदर्याला भुलून तरुणांनी केलेल्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागत आहे. बदनामीच्या भीतीने तरुण तडजोड करून पैसे द्यायला तयार होताना दिसत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फेसबुक अकाउंट लॉक करावे
मागील काही दिवसांमध्ये फेसबुक प्रोफाइलवरील माहिती चोरून दुसऱ्यांच्या नावाने बनावट अकाउंट सुरू करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बनावट अकाउंट सुरू करून मूळ व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमधील इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्‍सेप्ट करण्यात आल्यानंतर फेसबुक मेसेंजरवरून भावनिक मेसेज करून पैशांची मागणी करण्यात येते. त्यामुळे फेसबुकवरील खासगी माहिती चोरीला जाऊ नये म्हणून फेसबुक अकाउंट लॉक करून ठेवावे, तसेच अशाप्रकारे पैशांची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोनद्वारे चर्चा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

स्वप्नांच्या पंखांना मिळाले कौशल्याचे बळ!

तरुणांबरोबरच इतर वयोगटांतील पुरुषही अशा प्रकारच्या फसवणुकीला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली जात असल्याबाबतच्या  तक्रारी वाढल्या आहेत 
- अर्जुन मोहिते,  प्रभारी अधिकारी, पुणे ग्रामीण सायबर क्राइम पोलिस ठाणे

बापरे! पुण्यातील धूलिकणांत झाली तब्बल एवढ्या पटींनी वाढ

अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्‍सेप्ट करू नये. फेसबुकवर आलेल्या अश्‍लील लिंक ओपन करू नयेत, तसेच अश्‍लील फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नयेत. फसवणूक झाल्यास किंवा फसवणूक होण्याचा संशय आल्यास सायबर क्राइम पोलिसांशी संपर्क साधावा. 
- राजकुमार वाघचौरे, पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम पोलिस ठाणे, पुणे शहर

Edited By - Prashant Patil

loading image
go to top