आदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र ता. १ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र मंचर (ता. आंबेगाव, जि.

मंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र ता. १ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) पोस्ट कार्यालय इमारतीत (घोडेगाव रस्ता) गुरुवारी (ता.२२) सकाळी दहा वाजता स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.’’ अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख एस.बी. मोहिते यांनी दिली. 

मोहिते म्हणाले, “प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. ९९ व्या प्रशिक्षणसत्रात सरकारच्या शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये वर्ग तीन या पदाची नोकर भरती कर्मचारी निवड (लिपिक, टंकलेखक, कर्मचारी चयन आयोग, रेल्वे रिक्र्युटमेट आयोग, लोकसेवा आयोग) यांच्या मार्फत स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. उमेदवारांना साडेतीन महिने कालावधीचे स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण हे पूर्ण वेळ असून गणित, इंग्रजी लिपिक योग्यता, बौद्धिक चाचणी व सामान्यज्ञान हे विषय शिकविले जातात. उमेदवारांना स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केले जाते. १८ ते ३८ वयोगटातील दहावी उत्तीर्ण मुला मुलींसाठी प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व भोजनाची व्यवस्था उमेदवारांना स्वतः करावी लागेल. उमेदवारांनी सर्व मुळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह गुरुवारी (ता.२२) सकाळी दहा वाजता मंचरच्या कार्यालयात उपस्थित राहावे. दूरध्वनी क्रमांक ०२१३३ (२२३०८१) यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.’’

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर येथील आदिवासी उमेदवारांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन हजार ५८३ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यापैकी एक हजार १८७ उमेदवारांनी शासकीय व निमशासकीय खाजगी आस्थापानेमध्ये रोजगार मिळालेला आहे. युवक व युवतींनी मोफत प्रशिक्षणाची संधी घ्यावी.’’ असे आवाहन कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन अधिकारी मारुती तळपे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre-Examination Training course for tribal candidates