नेट, सेट पास झालेल्यांसाठी आनंदची बातमी; लवकरच जाहिरात निघणार

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 6 October 2020

महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर तासिका तत्त्वावर (सीएचबी) प्राध्यापक नियुक्ती केली जाते. राज्यात सुमारे 15 हजार प्राध्यापक या पद्धतीने काम करत आहेत.

पुणे : "कोरोना' काळात सरकारने नवी भरती बंद केली, त्याचा फटका तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांना बसला आहे. त्याबाबत नुकतीच मुंबईत बैठक झाली असून, सेट-नेट पात्र उमेदवारांना 'सीएचबी' तत्त्वावर निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याची जाहिरात लवकरच निघेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर तासिका तत्त्वावर (सीएचबी) प्राध्यापक नियुक्ती केली जाते. राज्यात सुमारे 15 हजार प्राध्यापक या पद्धतीने काम करत आहेत. "कोरोना'मुळे राज्य सरकारने सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियेवर बंदी घातली, त्यामध्ये स्पष्टता नसल्याने "सीएचबी'चे प्राध्यापक निवडण्यावर बंदी आली. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन देखील या नव्याने प्राध्यापक निवडता आले नाही. या प्राध्यापकांवर लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आली, त्यामुळेराज्य सरकारने "सीएचबी' प्राध्यापक निवडीस मान्यता द्यावी अशी मागणी केली जात होती. त्यासाठी विद्यापीठ स्तरांवर बैठका झाल्या होत्या, त्यानंतर त्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या पत्रकार सामंत म्हणाले, "शासनाने सीएचबी' प्राध्यापकांच्या निवडीवरील बंदी उठवावी अशी मागणी केली जात होती. याबाबत नुकतीच मुंबईत बैठक झाली असून, प्राध्यापकांच्या निवडीचा शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे. भरतीसाठी लवकरच जाहिरात काढले जाहिरात काढल्या जातील. यामध्ये संबंधित विषयाच्या सेट-नेट पात्र प्राध्यापकांना प्राधान्य दिले जाईल त्यानंतर इतर उमेदवारांचा विचार केला जाईल.

मेट्रो खोदकामातील रसायनमिश्रित पाणी सोडलं कॅनॉलमध्ये; कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी कारवाईची मागणी

40 टक्के प्राध्यापक भरतीबाबत विचार
राज्य सरकारने 40 टक्के प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. पण "कोरोना'मुळे शासनाने नव्या भरतीवर बंद आल्याने ती थांबविण्यात आली आहे. ही भरती पुन्हा सुरू व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यात भरती बंदी मधून प्राध्यापकांना वगळावे अशी मागणी केली आहे. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ही कोंडी सुटेल असे सामंत यांनी सांगितले.

पोलिसानेच केला पत्नीचा छळ; चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

जास्त बोलता येणार नाही, पण काळजी घेऊ
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली असली तरी महाविकास आघाडी सरकार व विरोधक ही स्थगिती उठावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नव्या वर्षाचे प्रवेश करताना यासंदर्भात तोडगा निघाले. यासंदर्भात मी जास्त बोलू शकत नाही, पण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preference will given to who qualified set net for selection process for CHB professor