समस्या सोडविण्यास प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुणे - प्रत्येक क्षेत्रात महिलांचा वाटा पुरुषांइतकाच असला तरी, शहरात महिलांचे बहुतांश प्रश्न दुर्लक्षितच आहेत. मात्र, सदाशिव पेठेतील महिलांच्या समस्या संवेदनशीलतेने जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेविका ॲड. रूपाली पाटील- ठोंबरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रभागात स्वच्छतागृहासारखे प्रकल्प उभे राहिले, अशा भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केल्या.

महिलांसाठी स्वच्छतागृह हा सर्वांत कळीचा आणि आरोग्याशी निगडित मुद्दा. त्यासाठी प्रभाग १५ मधील मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील- ठोंबरे यांनी भिकारदास मारुती मंदिर या भागात दुमजली स्वच्छतागृह तसेच अन्य पाच- सहा ठिकाणची स्वच्छतागृहे अद्ययावत करून महिलांची गैरसोय दूर केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कमोडची सुविधा केली. हे स्वच्छतागृह उभारण्यासाठी २५ लाख रुपये खर्च केले. नळजोडसह बोअरवेलची सुविधा पुरवून मुबलक पाणी उपलब्ध केले. घरगुती स्वच्छतागृहाप्रमाणे येथे स्वच्छता राखली जाते. प्रभागात पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न होता. हा विषय मुळापासून मार्गी लावण्यासाठी जुन्या लाइन काढून अधिक क्षमतेच्या नवीन लाइन टाकल्या. आज सदाशिव, बुधवार आणि शुक्रवार पेठेत पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा होतो, असे पाटील यांनी सांगितले.

शहराच्या मध्यवस्तीत विशेषतः पेठांच्या भागात पुरेशी व स्वच्छ स्वच्छतागृह नसल्याने महिलांनी जायचं कुठे हा प्रश्‍न होता. आता या भागात अद्ययावत, स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे आमचे आरोग्यही चांगले राखण्यास मदत झाली आहे.
- राधिका गोखले

प्रश्न सोडविण्यासाठीच नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे, याचे भान मी कायम राखले. त्यामुळे कधीही, कोणत्याही व्यक्तीला ताटकळत ठेवले नाही. उलट, ऑफिसला येण्याची गरज नाही, एका फोनवर तुमचे काम होईल, हा विश्वास मी नागरिकांना दिला. महिला असल्याने महिलांचे प्रश्न समजून घेऊ शकले.
- ॲड. रूपाली पाटील- ठोंबरे (नगरसेविका)

Web Title: Preferred to solve problems