Pune News : पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विलिनीकऱणाच्या प्रक्रियेबाबतची प्राथमिक बैठक संपन्न

येत्या तीन महिन्यात विलिनीकरण होणार- आमदार सुनील कांबळे
preliminary meeting on merger process of pune and khadki cantonment boards concluded
preliminary meeting on merger process of pune and khadki cantonment boards concludedSakal

कॅन्टोन्मेंट : पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या हद्दीतील नागरी भाग(सिव्हिलिअन एरिआ) पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेबाबत दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयासमोर सोमवारी(ता.१२) पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलिनीकरणासंदर्भातील पहिली बैठक संपन्न झाली.

बैठकीत पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विलिनीकरणा संदर्भातील प्रेझेंटेशन(सादरीकरण) दिले. तसेच राज्यातील अन्य कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विलिनीकरणाबाबतही चर्चा झाली. यावेळी बोर्डाकडून अहवाल मागवून येत्या तीन महिन्याच्या आत पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरण होणार असल्याचे आमदार सुनील कांबळे यांनी माहिती देताना सांगितले.

कांबळे म्हणाले की, पुढे राज्य सरकारकडून अहवाल गेल्यानंतरच केंद्र निर्णय घेणार आहे. सध्या राज्याने महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड दोघांनाही अंतिम अहवाल द्यायला सांगितले आहे. त्यामुळे सकारात्मकरित्या तीन महिन्याच्या आत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड महानगरपालिकेत विलीनीकरण होईल. असे कांबळे म्हणाले.

यावेळी झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाने देशातील 12 कॅन्टोन्मेंट बोर्डाला छावणीच्या हद्दीतून नागरी क्षेत्रांची छाटणी करण्याकरिता सकारात्मकरित्या ठराव पाठवण्याची विनंती केली आहे. यामध्ये सेंट्रल कमांडचे फतेहगड, देहरादून, शहाजहानपूर, क्लेमेंट टाउन, रामगड, मथुरा तसेच दक्षिण कमांडचे देवळाली, बबिना, मोरर, नसीराबाद ,अजमेर, सागर या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे.

बैठकीला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया यांच्यासह डिफेन्स इस्टेट विभाग पुणे चे डिफेन्स इस्टेट ऑफिसर आणि अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्च महिन्यांत पुढील बैठकीचे आयोजन कऱण्यात आले असल्याचेही समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com