
Prem Birhade
esakal
Viral Video: पुण्यातील एका कॉलेजमुळे माझी नोकरी गेली असा दावा लंडनमध्ये काम करणाऱ्या तरुणानं केलाय.याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तरुणाने म्हटलं की, मी कंपनीत काम करत होतो पण आता आयडी कार्ड परत देण्यासाठी निघालोय.पुण्यातील कॉलेजमुळे माझी नोकरी गेली. तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. यावर उलट सुलट प्रतिक्रियासुद्धा येत आहेत.