राज्यात लशीसाठी शीतगृहांची तयारी सुरू

Preparations for cold storage for vaccines started in the state
Preparations for cold storage for vaccines started in the state

पुणे: लहान मुलांच्या नियमित लसीकरणासाठी आवश्‍यक लस साठवण्याची भक्कम यंत्रणा राज्याच्या आरोग्य विभागाकडे सद्यःस्थितीत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लस साठवण्यासाठी शीतगृहे आणि त्याच्या वितरणासाठी शितपेट्यांची व्यवस्था सज्ज करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून अत्यावश्‍यक उपकरणांचा पुरवठा होत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली.

लस साठवणूक व्यवस्था
आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर्स आणि डीप फ्रिजर्स अशी उपकरणे राज्यभरात आरोग्य खात्याकडे आहेत. आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर्समध्ये 2 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते. तर, डीप फ्रिजर्समध्ये उणे 16 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात लस ठेवता येते. सद्यःस्थितीत या दोन्ही प्रकारची प्रत्येकी चार उपकरणे राज्यात आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागात सध्या 16 वॉक इन कुलर्स आहेत. त्यात आणखी पाच नवीन कुलर्स बसविण्यात आले आहेत. अशा प्रकारे 21 पर्यंत यांची संख्या आहे. राज्यभरात सहा वॉक इन फ्रिजर्स आहेत. हे सर्व कार्यान्वित असून, त्याचा वापर लशीच्या साठवणुकीसाठी करता येईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारकडून प्रत्येक सहा वॉक इन कुलर आणि दोन वॉक इन फ्रिजर्स मिळाले आहेत. ते आरोग्य खात्याच्या आठ परिमंडळाच्या ठिकाणी हे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी अत्यावश्‍यक यंत्रणा सज्ज केल्या जात आहेत. त्यात वीजपुरवठा, त्याचा बॅंकअप आणि त्याच्यासाठी जागा निश्‍चित करण्यात येत आहेत. कोरोना लसीची नेमक्‍या किती तापमानाला साठवणूक करायची, त्याचे किती डोस आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप हाती आली नाही. मात्र, त्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

निडल सिरिंजेस
कोरोना प्रतिबंधक लसीचे इंजेक्‍शनसाठी निडल सिरिंजेस लागणार आहे. त्याचीही संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे या सिरिंजेस साठवण्याची तयारी आता सुरू होत आहे. पुण्यासह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येत आहे.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

प्रशिक्षित मनुष्यबळ
कोरोना लसीचे इंजेक्‍शन देण्यासाठी प्रशिक्षण मनुष्यबळ अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी नावे निश्‍चित करण्यात येत आहेत. येत्या 15 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यातून इंजेक्‍शन देण्यासाठी किती जणांची गरज लागणार आहे, ही माहिती मिळेल. त्या दृष्टीने लस देण्याचे प्रशिक्षण देता येईल.

''महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने चांगल्या प्रकारे लसीकरणाचा कार्यक्रम राबविला आहे. त्यासाठी लसीकरणाची पायाभूत यंत्रणा सज्ज आहे. तसेच, लस देण्यामध्येही आरोग्य खात्यातील डॉक्‍टर आणि परिचारिका तज्ज्ञ आहेत. खात्यातील सर्वांना कोल्डचेनची, लस देण्याच्या तंत्राची त्यांना माहिती असते. त्यामुळे कोणती लस द्यायची आहे, किती तापमानात ती लस ठेवायची आहे, किती डोस, कसे द्यायचे आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत, याची अद्ययावत माहिती कर्मचाऱ्यांना द्यावी लागते.''
- डॉ. अर्चना पाटील, संचालक, आरोग्य सेवा, सार्वजनिक आरोग्य खाते.


आळंदीत उद्यापासून संचारबंदी ; धर्मशाळा, लॉजिंगमध्ये निवासास बंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com