प्रेरणा तुलसियानीला 99 टक्के गुण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पुण्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. दहावीच्या परीक्षेत 98 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी आहेत. तसेच गणित, विज्ञान, समाजशास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. 

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पुण्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. दहावीच्या परीक्षेत 98 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी आहेत. तसेच गणित, विज्ञान, समाजशास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. 

औंधमधील डीएव्ही पब्लिक स्कूलच्या प्रेरणा तुलसियानी या विद्यार्थिनीला 99 टक्के गुण मिळाले आहेत, तर ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील अखिल अत्रे आणि ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमधील शुभम बकरे या दोघांनी 98.4 टक्के गुण मिळवत त्यांच्या शाळांमध्ये पहिला क्रमांक मिळविला आहे. गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या अंजली नायर या विद्यार्थिंनीला 98 टक्के गुण मिळाले आहेत. शहरातील सीबीएसईच्या 80 ते 85 टक्के शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. 

*राधेय पंडितचे चमकदार यश 
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमधील शुभम बकरे याने 98.4 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. श्‍लोक वासुदेव याने 97.8 टक्के मिळवत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

आकलनशक्ती कमी असलेल्या (लर्निंग डिसबॅलिटी) राधेय पंडित या विद्यार्थ्याने 75.2 टक्के गुण मिळविले आहेत. 

शाळेच्या संचालक डॉ. अमृता वोहरा म्हणाल्या, ""विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी घेतलेले कष्ट निकालातून दिसत आहेत. शाळेचा निकाल लागण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे वाटतात.'' 

आकार जैनला 97 टक्के गुण 
भुकूम येथील संस्कृती शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून, शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले आहेत. शाळेतील आकार जैन या विद्यार्थ्याने 97.6 टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. अमेय बलसारा याने 97.04 टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. 

आकार जैन : ""दहावीच्या परीक्षेत संस्कृत हा विषय माझ्यासाठी अवघड होता; परंतु त्यातही मला चांगले गुण मिळाले आहेत. समाजशास्त्र आणि विज्ञान विषयात स्कोअर करता आले. दररोज अभ्यास करत होतो, त्यामुळे परीक्षेच्या काळात खूप टेन्शन आले नाही.'' 
- आकार जैन, विद्यार्थी (97.06 टक्के) 

दिव्या कुमार शाळेत प्रथम 
मुंढव्यातील ऑरबिस शाळेतील आठ विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण, तर शाळेतील 88 टक्के विद्यार्थ्यांना 80 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. दिव्या कुमार या विद्यार्थिनीने 95.05 टक्के गुण मिळवत शाळेत पहिली येण्याचा मान मिळविला आहे. 

विहान दोषीला 97 टक्के 
द ऑर्किड स्कूलमधील 100 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. शाळेतील 22 विद्यार्थ्यांना 91 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत, तर 35 विद्यार्थ्यांना 81 ते 90 टक्के गुण आहेत. विहान दोषी या विद्यार्थ्याने 97.8 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे, तर तन्मय गोयल याने 97.6 टक्के गुण मिळवीत शाळेत द्वितीय आला आहे. त्याला गणितात 100 गुण मिळाले आहेत. वैभव देशमुख हा 95.6 टक्के गुण मिळवीत शाळेत तिसरा आला आहे. 

शाळा : शाळेतील पहिले तीन क्रमांक मिळविलेले विद्यार्थी - 
- सिटी इंटरनॅशनल स्कूल (वानवडी) : एम. प्रज्ञा (97 टक्के), लक्ष्मी कर्रे (96 टक्के) सलोनी सावंत (94 टक्के) 
- आर्मी पब्लिक स्कूल (खडकी) : अंजनी कुमार (97.4 टक्के), महक चौधरी (96.8) आर्यमान सिंग (96.6 टक्के) 
- द ऍमनोरा स्कूल : प्रर्णिका श्रीजा (95.8 टक्के), पाखी वशिष्ठ (94.4 टक्के), देवांशी बिस्वाल (94.2 टक्के) 
- एसएनबीपी (रहाटणी) : श्रावणी नलबलवार (97.4 टक्के) 
- सिटी प्राइड (निगडी-प्राधिकरण) : यश कुलकर्णी (97.2 टक्के), रेवा रासने (97 टक्के), वैष्णवी कुलकर्णी आणि निहार अहिरे (96.8 टक्के) 
- गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल : अंजली नायर (98 टक्के), पलक भंडारी (96 टक्के), उत्कर्ष रस्तोगी (95.6 टक्के) 
- ज्ञानप्रबोधिनी प्रशाला : अखिल अत्रे (98.4 टक्के), मृण्मयी करवंदे (97.2 टक्के), गार्गी म्हसकर (97.2 टक्के) 
- आर्यन्स वर्ल्ड स्कूल : सोनिया अंजा (96 टक्के), दीक्षा प्रसाद (91 टक्के), आशी गोयल (90 टक्के) 
- राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल : साक्षी कमलापुरे (85.4 टक्के), ओंकार गोरवडे (83.8 टक्के), शुभम शिंदे (83.8 टक्के) 
- लोकसेवा ई-स्कूल (पाषाण) : आरुषी वाघ (96.4 टक्के) 
- डीव्हीए पब्लिक स्कूल : प्रेरणा तुलसियानी (99 टक्के), स्नेहा वेंकटेश्‍वरन (98.6 टक्के), किशोर राजेंद्रन (98.4 टक्के) 

Web Title: preranaTulsiani has 99 percent marks CBSE SSC result