नसरापुरात निसर्गमित्रांकडून अनोख्या जातीच्या सरड्यांच्या 30 पिलांचे जतन

किरण भदे
मंगळवार, 30 जून 2020

  • शाँमेलियाँन सरड्याचे संगोपन

नसरापूर : वन्यप्राणी मित्रांना सापडलेल्या दुर्मिळ शाँमेलियाँन जातीच्या सरड्याच्या 47 अंड्याचे जनत करुन त्यामधील 30 अंड्या मधुन बाहेर आलेल्या शाँमेलियाँनच्या पिल्लांची योग्यती काळजी घेवून त्यांना पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक संघटनेचे सदस्य जुन्नर येथील दिपक माळी व अनिल कानस्कर (सुतारवाडी) यांना पुणे येथे शाँमेलियाँन सरडा सापडला होता या सरड्याची त्यांनी त्यांच्या संघटनेत व नसरापूर वनविभागाच्या कार्यालयात नोंद करुन त्यास सुरक्षीतस्थळी सोडण्या आगोदरच त्यास ठेवलेल्या बाटली मध्ये या सरड्याने 25 नोव्हेंबर 2019 रोजी  47 अंडी दिली होती सरड्याच्या या मादीस निसर्गात सोडल्यावर या अंड्यांचे जतन करुन कृत्रिमरित्या उबवुन पिलांना जन्म देण्याचा निर्णय वन्यप्राणी संस्थेच्या सदस्यांनी घेतला व त्या 47 अंड्यांची वनविभागात रितसर नोंद करुन संस्थेचे अध्यक्ष सुशिल विभुते व उपाध्यक्ष शंकर वाडकर यांनी घरीच कृत्रीमरित्या उबवण्यास ठेवण्यात आली  त्या अंड्या मधुन सहा महिने 23 दिवसा नंतर 47 पैकी 30 अंड्या मधुन 30 पिल्ले बाहेर आली असुन सर्व पिल्ले सक्षम आहेत या सर्व पिलांची वन्यप्राणी संघटनेच्या वतीने नसरापूर वनविभागात नोंद करुन त्यांना सुरक्षित अशा निसर्गात सोडण्यात आले. 
-------------
खूशखबर ! भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार
-------------
सुशिल विभुते यांनी या बाबत माहीती देताना सांगितले कि, दुर्मिळ आशा या शाँमेलियाँन सरड्याचे जनत होणे गरजेचे आहे निसर्गात ही सर्व अंडी सोडली असती तर साप किेंवा इतर प्राण्यांनी ही अंडी खाल्ली असती आमच्या वन्यप्राणी मित्राकडे आम्ही कृत्रीमरित्या उबवल्या मुळे 47 पैकी तीस अंड्या मधुन सक्षम अशी पिले निर्माण झाली आहेत व शाँमेलियाँन जातीचे रक्षण देखिल झाले आहे याचा आम्हाला आनंद आहे बहुदा प्रथमच अशा कृत्रिमरित्या सरड्याची अंडी ऊबवण्यात आली असावीत असा अंदाज देखिल त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preservation of 30 unique species of squirrels in Nasrapur Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: