esakal | पुण्यातील आठ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर
sakal

बोलून बातमी शोधा

police.jpg

-शिरीष सरदेशपांडे, सुषमा चव्हाण, सुनील यादव यांच्यासह आठ जणाचा समावेश.

पुण्यातील आठ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : स्वातंत्र्य दिनाचा पार्श्वभुमीवर केंद्र सरकारकडून दिले जाणारे राष्ट्रपती विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पुण्यातील आठ पोलिस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे पोलिस दलातील परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, कोथरुड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुषमा चव्हाण, पोलिस उपअधिक्षक अनिल पाथरुडकर, रेल्वेच्या पुणे विभागातील पोलिस उपअधिक्षक नरेंद्रकुमार गायकवाड, दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाची सुनील यादव व राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ ग्रुप एक) असिस्टंट कमांडंट सादिकअली सय्यद यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image