Liver Diseases : गर्भावस्थेत महिलांमध्ये यकृताच्या आजारांचे प्रमाण ठरते चिंतेची बाब

गर्भवती महिलांमध्ये यकृताच्या आजारांचे प्रमाण ही चिंतेची बाब ठरत आहे. बहुसंख्य गर्भवतींमध्ये ‘इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस’ची समस्या दिसून येते.
pregnant women
pregnant womensakal

पुणे - गर्भवती महिलांमध्ये यकृताच्या आजारांचे प्रमाण ही चिंतेची बाब ठरत आहे. बहुसंख्य गर्भवतींमध्ये ‘इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस’ची समस्या दिसून येते. गर्भावस्थेतील कोलेस्टेसिस यकृताची समस्या आहे. हे पित्ताशयातून पित्ताचा सामान्य प्रवाह कमी करते किंवा पूर्णपणे प्रतिबंधित करते.

त्यामुळे कावीळ, खाज सुटणे आणि त्वचा पिवळी पडते. गरोदर महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, वेळीच उपचार करणे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधांचे वेळोवेळी सेवन करणे ही काळाची गरज आहे.

गर्भधारणेमुळे स्त्रीच्या शरीरात विविध बदल होतात, त्यापैकी एक म्हणजे यकृताच्या कार्यामध्ये लक्षणीय बदल होतात. या कालावधीत यकृताचे अनेक रोग आढळून येतात. काही सौम्य, तर काही प्राणघातक ठरण्याचा धोका असतो. गर्भधारणेच्या ‘इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस’ग्रस्त महिलांची संख्या जास्त आहे.

एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के व्यक्तींना पित्ताशयाचा आजार दिसून येतो. वाढत्या वयातील गर्भधारणा किंवा व्यसनाधीन व्यक्तींमध्ये, तसेच यकृताच्या आजाराचा वैद्यकीय इतिहास असलेल्यांमध्ये याची २० टक्क्यांनी वाढ होते. त्यामुळे ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मातांना अंतर्निहित कारणांमुळे त्रास जाणवतो.

मदरहूड रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती गायकवाड म्हणाल्या, ‘सामान्यतः गरोदर माता लक्षणे-मुक्त असू शकतात. गर्भधारणेदरम्यान यकृत कार्याच्या तपासणीमध्ये निदान होऊ शकते, परंतु जेव्हा ‘कोलेस्टेसिस’ वाढत जाते, मातांना संपूर्ण शरीरावर विशेषतः तळवे आणि पायावर खाज येऊ शकते. त्यांना संपूर्ण शरीरावर पुरळदेखील दिसून येते. खाज सुटणे, उजव्या बाजूच्या वरच्या ओटीपोटात दुखणे आणि उपचार न केल्यास कावीळ आणि चेहऱ्यावर पिवळेपणा दिसून येतो.’

अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ते म्हणाले, ‘गर्भवती मातांनी आजाराची लक्षणे आणि संभाव्य धोके वेळीच ओळखणे गरजेचे आहे. उपचार हे प्रामुख्याने लक्षणांचे व्यवस्थापन आणि गुंतागुंत कमी करण्यास मदत करते.’

कारणे काय?

  • पूर्वीचा वैद्यकीय इतिहास

  • यकृताचे किंवा स्वादुपिंडाचे आजार

  • वाढलेले वय

  • उशिराने झालेले लग्न

  • उशिराने झालेली गर्भधारणा

  • दारूचे व्यसन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com