बटाट्याचे भाव निम्याने घसरले;उत्पादक शेतकरी चिंतेत 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

प्रतिकिलोला भाव १५ ते २० रुपये मिळत आहे. बटाट्याची मागणी घटल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. बटाट्याचे भाव अजून घसरले तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. 

चाकण - खेड बाजार समितीच्या येथील बाजारात बटाट्याला बटाट्याचे भाव प्रतिकिलोला १५ ते २२ रुपये भाव मिळाले. आठवडाभरापूर्वी ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोला भाव मिळत होता. त्यामुळे बटाट्याचे भाव निम्म्याने घसरले. दरम्यान, किरकोळ बाजारात सर्वसामान्य ग्राहकाला बटाट्यासाठी एका किलोला चाळीस ते पंचेचाळीस रुपये मोजावे लागत आहेत. 

प्लॅस्टिक बंदी केवळ कागदावरच!;कोरोनाच्या उद्रेकामुळे कारवाया कमी झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

चाकण (ता. खेड) बाजारात बटाट्याची बाराशे क्विंटल आवक झाली, असे खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले. सध्या नव्याने काढणी केलेला बटाटा विक्रीसाठी येत आहे. त्याचबरोबर आग्रा व गुजरातमधूनही बटाटा विक्रीसाठी येत आहे. आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाव घसरत आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. आग्रा बटाटा शीतगृहात साठवणूक केलेला आहे. त्याला प्रतिकिलोला भाव १५ ते २० रुपये मिळत आहे. तोही बटाटा स्थनिक नव्या बटाट्याच्या बरोबरीत आहे. बटाट्याची मागणी घटल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. बटाट्याचे भाव अजून घसरले तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. 

राज्यात थंडी पुन्हा वाढणार; पुण्यात थंडी कमी

राज्यातील व जिल्ह्यातील नव्याने काढणी केलेल्या बटाट्याची आवक वाढली आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेश आग्रा व गुजरात येथील बटाट्याची पन्नास टनांवर आवक चाकण बाजारात दर आठवड्याला होत आहे. ती मोठी आहे. तसेच, वर्षअखेरीस मागणी घटल्यामुळे बटाट्याला उठाव नाही. त्यामुळे भाव घसरत आहेत. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिकारक आहे. 
- विनायक घुमटकर, सभापती, खेड बाजार समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Price of potato was Rs.15to22per kg In the market of Khed Bazar Samiti