esakal | ‘किसान सन्मान’साठी पुणे जिल्ह्याचा गौरव

बोलून बातमी शोधा

नवी दिल्ली - केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत उल्लेखनीय कामकाजाचा पुरस्कार स्वीकारताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे व }

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील उल्लेखनीय कामकाजासाठीचा पुरस्कार केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना बुधवारी प्रदान करण्यात आला.

‘किसान सन्मान’साठी पुणे जिल्ह्याचा गौरव
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील उल्लेखनीय कामकाजासाठीचा पुरस्कार केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना बुधवारी प्रदान करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. या वेळी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या पाच लाख ३० हजार २३५ एवढी आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत पाचशे कोटी ५४ लाख १४ हजार एवढा निधी पोर्टलद्वारे जमा करण्यात आला. भौतिक तपासणीसाठी २० हजार १३ एवढ्या लाभार्थ्यांची यादी पोर्टलद्वारे प्राप्त झाली होती. त्याचे कामकाज शंभर टक्के पूर्ण करण्यात आले आहे. योजनेतील एक लाख ७९ हजार एवढ्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले आहे. लाभार्थ्यांच्या बँकेचा चुकीचा तपशील ४८ हजार २९५ इतका दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच, तक्रार निवारणासाठी एक हजार २३५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचे संपूर्ण निराकरण करण्यात आले आहे. 

गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; थेऊरच्या 'श्री चिंतामणी' मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद

उल्लेखनीय कामकाज
पीएम किसान योजनेंतर्गत तक्रार निवारणात पुणे जिल्ह्याने उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. कोरोनासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत तालुका स्तरावर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी योजनेचे कामकाज ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार पूर्ण केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागातील प्रधानमंत्री योजनेचे कामकाज पाहणारे पथक, राष्ट्रीय सूचना केंद्रातील वैज्ञानिक आणि सर्व तहसीलदार यांच्या पथकांनी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या; पानशेतमधील पीडीत कातकरी कुटुंबाची हाक

Edited By - Prashant Patil