esakal | चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या; पानशेतमधील पीडीत कातकरी कुटुंबाची हाक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_rape

किरकटवाडी (पुणे) : जात प्रमाणपत्राच्या अभावामुळे वर्षानुवर्षे शासकीय सुविधांपासून वंचित असलेल्या सिंहगड परिसरातील आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांसाठी जात प्रमाणपत्र मिळवून देणार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पानशेत जवळील कुरण ता. वेल्हे येथील पीडीत कुटुंबाच्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर दिली आहे.यावेळी दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याची मागणीही चाकणकर यांनी केली आहे.

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या; पानशेतमधील पीडीत कातकरी कुटुंबाची हाक

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

कुरण येथील कातकरी समाजातील दोन वर्षांच्या मुलीचे 15 फेब्रुवारी रोजी अपहरण झाले होते. 16 फेब्रुवारी रोजी तिचा मृतदेह सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस मालखेड-थोपटेवाडी रस्त्यावरील पुलाखाली आढळला होता. शवविच्छेदन अहवालातून लैंगिक अत्याचारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी संजय बबन काटकर या 38 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आलेली आहे. या पीडीत कुटुंबाची कुरण येथे जाऊन चाकणकर यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. तसेच कुटुंबाला गृहोपयोगी वस्तूंची मदत केली.

व्यापाऱ्यांचा शुक्रवारी भारत बंद; जाचक जीएसटी विरोधात चक्काजामचा इशारा​

जात प्रमाणपत्राच्या अभावामुळे वर्षानुवर्षे शासकीय सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. आता त्यांना जात प्रमाणपत्र घरपोच मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सिंहगड परिसरातील पानशेत जवळील कुरण (ता. वेल्हे) येथील पीडीत कुटुंबाच्या भेटीदरम्यान चाकणकर यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी कातकरी समाजातील नागरिकांकडे जातीचे दाखले नसल्याने त्यांना शासकीय सुविधांचा लाभ मिळत नाही हे पानशेत येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश पासलकर यांनी रुपाली चाकणकर यांना सांगितले. चाकणकर यांनी तेथून लगेच जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्याशी याबाबत फोनवरून चर्चा केली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी संबंधित नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले. 

'काँग्रेसचं घराणेशाहीचं राजकारण आता संपुष्टात; संसदेत आजवरच्या सर्वांत कमी जागा'​

घरी जाऊन दिले जाणार जात प्रमाणपत्र

आदिवासी कातकरी समाजातील नागराकांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे. शासकीय कार्यालयात जाऊन कागदपत्रे मिळवणे त्यांना शक्य होणार नाही, त्यामुळे प्रशासनाच्या मदतीने राहत्या ठिकाणी जात प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करणार असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, वेल्हे तालुका अध्यक्ष प्रमोद लोहकरे, माजी सरपंच आशा अंकुश पासलकर, राहुल ठाकर, किर्ती देशमुख, सारिका रानवडे, योगिता तोडकर, शुभांगी खिरीड, ममता फाळके, शुभांगी हाळंदे, अविनाश ठाकर, वसंत चरेकर आणि आदिवासी कातकरी समाजातील नागरिक उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image