esakal | पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील १७०० एलपीएम क्षमतेच्या आॅक्सिजन प्लांटचे आॅनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हा कार्यक्रम उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात आॅक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरात आॅक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यास सुरवात केली. त्यापैकी एक शिवाजीनगर येथील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पिटल येथील १७०० एलपीएमच्या क्षमतेचा प्लांट पीएसए टेक्नॉलॉजी वापरून उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन

आॅनलाइन पद्धतीने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विद्युत मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

loading image
go to top