पंतप्रधान नरेंद्र मोदी 'स्वामित्व'साठी पोहचले पुण्यातील कोंढणपूर-अवसरेनगर गावात

महेंद्र शिंदे
Sunday, 11 October 2020

स्वामित्व योजनेसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातून कोंढणपूर-अवसरेनगर गावची निवड करण्यात आली होती. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोंढणपूर-अवसरवाडी ग्रामस्थांशी याविषयी थेट संवाद साधला.

खेड-शिवापूर : "स्वामित्व योजना ही आधुनिक आणि पारदर्शी आहे. त्यामुळे कोणताही वाद न होता प्रत्येक गावाचा सुनियोजित पद्धतीने विकास होण्यास मदत होईल," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वामित्व योजनेसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातून कोंढणपूर-अवसरेनगर गावची निवड करण्यात आली होती. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोंढणपूर-अवसरवाडी ग्रामस्थांशी याविषयी थेट संवाद साधला. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे ते थेट पुण्यातील एका गावातच पोहचले. ग्रामस्थांच्या वतीने विश्वनाथ मुजुमले यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला.

'डीएसके प्रकरण : उलाढालीचा रिपोर्ट अडकला लालफितीत; तपास यंत्रणेकडून दिरंगाई 

यावेळी मोदी यांनी स्वामित्व योजना राबविताना काही अडचणी आल्या का? प्रॉपर्टीची हद्दनिश्चिती करताना काही वाद झाले का? स्वामित्व योजनेबाबत ग्रामस्थ समाधानी आहेत का? आदी विचारणा केली. 

मोदी म्हणाले, "स्वामित्व योजना ही आधुनिक आणि पारदर्शी आहे. हा माझा किंवा हा तुझा असा कोणताही भेदभाव यामध्ये नाही. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे मिळतील. तसेच कोणताही वाद न होता प्रत्येक गावाचा सुनियोजित पद्धतीने विकास होईल."

आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार​

यावेळी गावांची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक लोक गावठाणाबाहेर राहत आहेत. त्यासाठी गावठाणाची हद्द वाढविण्यात यावी, अशी विंनती मुजुमले यांनी मोदी यांना केली. त्याला उत्तर देताना तुमची ही मागणी महाराष्ट्र सरकारपर्यंत पोचविण्यात येतील, असे आश्वासन मोदी यांनी दिले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Modi interacted with the villagers of Kondanpur-Avsarenagar