पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्चला पुण्यात; निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्चला पुण्यात; निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन

पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या (Pune Municipal Election) पूर्वी शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे (Projects) उद्घाटन (Inauguration) आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर (Tour) येणार आहेत. यामध्ये बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

भाजपने पुणे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी यापूर्वी सुरू केली आहे. डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला तसेच महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन केले होते. दरम्यान, निवडणुकीच्या पूर्वी नागरिकांचे मेट्रोतून धावण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. गेल्या महिन्यात फुगेवाडी ते पिंपरी हा मार्ग सुरू करण्यास अंतिम मान्यता मिळाली आहे. तर वनाज ते गरवारे महाविद्यालय याचे शेवटची तपासणी शिल्लक असून, मार्च महिन्यापर्यंत त्यासही मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची उद्घाटनासाठी लगबग

मेट्रोच्या उद्घाटनासाठी मोदी पुण्यात येणार असल्याने भाजपने त्याचबरोबर संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन यासह इतर कार्यक्रमांचा यात समावेश असेल.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मेट्रो, नदी काठ सुधार प्रकल्प, एक हजार घरांची लॉटरी, ईबसेसचे लोकार्पण यासह इतर कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी तयारी सुरू केली आहे.’

- मुरलीधर मोहोळ महापौर

Web Title: Prime Minister Narendra Modi In Pune On March 6 Inauguration Of Important Projects Before Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..