Loksabha 2019 : पंतप्रधान मोदींची बारामती सभा लांबणीवर

मिलिंद संगई
रविवार, 7 एप्रिल 2019

बारामती  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 10 एप्रिलला होणारी नियोजित जाहीर सभा पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आज ही माहिती दिली. 
 

बारामती  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 10 एप्रिलला होणारी नियोजित जाहीर सभा पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आज ही माहिती दिली. 

पंतप्रधान देशभरात दोनशेहून अधिक सभा घेणार आहेत. त्यामुळे देशभरातील सभांचे वेळापत्रक निश्चित होत असून अत्यंत व्यस्त कार्यक्रमामुळे 10 एप्रिल ऐवजी पुढच्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान सभा घेतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बारामतीची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकायचीच असल्याने भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे.

नरेंद्र मोदी यांची या मतदारसंघात सभा व्हावी असा सर्वांचाच आग्रह असल्याने मोदी यांनी तो मान्य केला आहे. सभेची तारिख निश्चित होताच त्याची घोषणा केली जाईल, असेही पाटील यांनी जाहीर केले.शेवटच्या टप्प्यात सभा घेतल्याचा अधिक लाभ मतदानातून होतो, अशी अटकळ असल्यानेही कदाचित ही सभा शेवटच्या टप्प्यात व्हावी अशी भाजपचीच व्यूहरचना असावी असाही अंदाज व्यक्त होतो आहे. 

 

Web Title: Prime Minister Narendra Modi meeting of Baramati postponed