Good News : गंभीर आजारांसाठी पंतप्रधान निधीतून आर्थिक मदत

health, Doctor, illness
health, Doctor, illness
Updated on

Good News : गंभीर आजारांसाठी पंतप्रधान निधीतून आर्थिक मदत
पुणे : देशपातळीवर पंतप्रधान सहाय्यता निधी आहे. भारतात गंभीर आजारांवरील उपचार खुप महागडे आहेत. त्यामुळे देशातील अनेक गरीब व्यक्तींना केवळ पैशाअभावी दुर्धर आजारांवर उपचार करता येत नाहीत. केवळ पैशांअभावी कोणीही उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी गरजूंना पंतप्रधान सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात येते. देशातील प्रत्येक राज्यात राज्यस्तरावर अशाच पद्धतीचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे. भारतातील गरिबातील गरिब व्यक्तींनाही गंभीर आजारांवरील उपचार मिळावेत, या उद्देशाने पंतप्रधान सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात येते.

ह्रदयरोग, कर्करोग आणि किडनीच्या विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना ही मदत दिली जाते. दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील रुग्णांनाच या आर्थिक मदतीचा लाभ घेता येतो. अशा कुटुंबांमधील कोणत्याही व्यक्तीला ही मदत मिळते. वरील तीनपैकी कोणत्याही एका रोगाने ग्रस्त असलेली आणि दारिद्रयरेषेखालील कुटुंबाचा सदस्य असलेली देशातील कोणीही व्यक्ती या मदतीसाठी पात्र ठरते. यासाठी स्थानिक खासदाराने प्रयत्न केल्यास ही मदत हमखास मिळू शकते. मात्र यासाठी वरील तीनपैकी कोणत्याही एका रोगाबाबाबत केली जाणारी शस्त्रक्रिया ही पुर्वनियोजित असणे आवश्यक आहे. कारण ही मदत शस्त्रक्रिया करण्यापुर्वीच दिली जाते. शस्त्रक्रिया होऊन गेल्यानंतर ही आर्थिक मदत दिली जात नाही. यासाठी या मदतीच्या मागणीबाबतचा वेळेत पोचणे अनिवार्य आहे.

शस्त्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर केला जाणारा अर्ज हा मदतीसाठी विचारात घेतला जात नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळालेले रुग्णांनाही या आर्थिक मदतीचा लाभ घेता येतो. या योजनेतून किमान दोन तर कमाल पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते. 

योजनेचे पात्रता निकष :- 
- रुग्ण दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावा.
- कर्करोग, ह्रदयरोग किंवा किडनी विकाराचे निदान झालेले असणे अनिवार्य.
- वरील तीनपैकी कोणत्याही एका रोगाची शस्त्रक्रिया पूर्वनियोजित असणे आवश्यक.
- आधीच शस्त्रक्रिया झालेली नसावी.
- हा अर्ज इंग्रजी किंवा हिंदी भाषेतच करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे :- 
- पंतप्रधानांच्या नावाने अर्ज.
- स्थानिक खासदारांचे शिफारसपत्र.
- रोगाचे निदान झाल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
- तहसीलदारांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र.
-  सरकारी किंवा सरकारमान्य रुग्णालयाने दिलेले शस्त्रक्रिया खर्चाचे अंदाजपत्रक.
अर्ज कोठे कराल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विशेष कार्य अधिकारी, पंतप्रधान सहाय्यता निधी, पंतप्रधान कार्यालय, नवी दिल्ली-११. (Prime Ministers Relief Fund, Officer On Special Duty, Prime Ministers Office, New Delhi-11) या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागतो. 
- या अर्जाच्या लिफाफ्यावर 'पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदतीसाठी अर्ज' असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. 
(संकलन :- गजेंद्र बडे).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com